शेळीपालक महिलांना व्यवसाय वाढीसाठी बिगर तारण कर्जाचे वितरण

नाशिक : सिन्नर तालुक्यातील युवा मित्र संस्थेच्या माध्यमातून सिन्नर, संगमनेर व राहता तालुक्यातील ८० गावांतील ८ हजार महिलांसोबत शेळी पालनावर आधारित महिला उपजीविका विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
Occupation of goat women Distribution of non-mortgage loans for growth
Occupation of goat women Distribution of non-mortgage loans for growth

नाशिक : सिन्नर तालुक्यातील युवा मित्र संस्थेच्या माध्यमातून सिन्नर, संगमनेर व राहता तालुक्यातील ८० गावांतील ८ हजार महिलांसोबत शेळी पालनावर आधारित महिला उपजीविका विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

महिलांनी सुरु केलेल्या शेळीपालन व्यवसावसाय वाढीसाठी आर्थिक मदतीची गरज होती. ही अडचण संस्थेने बँक ऑफ महराष्ट्राच्या निदर्शनास आणून दिली. बँकेकडून या व्यवसायाच्या वाढीसाठी बिगर तारण कर्ज योजना जाहीर करण्यात आली. त्यानुसार प्रातिनिधिक स्वरुपात दहा शेळीपालक महिलांना कर्ज मंजुरीचे पत्र वितरित करण्यात आले. 

शेळीपालक महिलांसाठी कर्ज वितरण कार्यक्रम युवामित्र संस्थेच्या प्रांगणात नुकताच झाला. यावेळी 'बँक ऑफ महाराष्ट्र'चे महाव्यवस्थापक व विभागीय व्यवस्थापक एल. एस. देशपांडे,'नाबार्ड'चे जिल्हा विकास व्यवस्थापक अमोल लोहकरे, बँक ऑफ महाराष्ट्र नाशिक विभागचे आर. डी. सोनजे, उपविभागीय व्यवस्थापक ए. शेखर, मुख्य जिल्हा प्रबंधक संदीप माळी, युवा मित्र संस्थेचे कार्यकारी संचालक सुनील पोटे, संचालिका मनिषा पोटे आदी उपस्थित होते. 

या योजनेमध्ये शेळी खरेदी, गोठा बांधणे व व्यवसायासाठी खेळत्या भांडवलाचा समावेश केला आहे. याअंतर्गत दोन प्रकारचे कर्ज देण्यात येणार आहे. यामध्ये मध्यम मुदत कर्ज हे ५ वर्षांसाठी असून ९.७५ टक्के व्याजदर असेल. दुसरे कर्ज खेळते भांडवल/किसान क्रेडीट कार्ड ७ टक्के व्याजदराने देण्यात येईल. बँकेच्या वतीने एकूण प्रकल्प किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम शेळीपालकांना भरावी लागेल. 

५०० शेळीपालकांना या योजनेचा लाभ होईल. बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने या योजनेसाठी या आर्थिक वर्षासाठी ५ कोटी निधी राखून ठेवण्यात आला आहे. युवा मित्र संस्थेचे सुनील पोटे यांनी प्रास्तविक, तर संचालिका मनिषा पोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com