कापसाची महिनानिहाय आकडेवारी आवश्यक

देशात यंदा अपेक्षेच्या तुलनेत कापूस उत्पादन कमी झालेले आहे. यंत्रणा सुरुवातीला जास्त उत्पादनाचे अंदाज व्यक्त करतात. त्यामुळे बाजारात दर घसरल्याने शेतकऱ्यांना कमी दरात कापूस विकावा लागतो.
cotton
cotton

देशात यंदा अपेक्षेच्या तुलनेत कापूस उत्पादन कमी झालेले आहे. यंत्रणा सुरुवातीला जास्त उत्पादनाचे अंदाज व्यक्त करतात. त्यामुळे बाजारात दर घसरल्याने शेतकऱ्यांना कमी दरात कापूस विकावा लागतो. मात्र आवक हंगामाच्या शेवटी याच यंत्रणा कमी उत्पादनाचे अंदाज जाहिर करतात. त्यामुळे शेवटी दर वाढतात आणि याचा लाभ व्यापाऱ्यांनाच अधिक होतो. त्यामुळे उत्पादन, वापर, आयात, निर्यातीची महिनानिहाय अकडेवारी मिळाल्यास शेतकऱ्यांना विक्रीचे नियोजन करता येईल. ही आकडेवारी देण्यासाठी मार्गदर्शक मंडळाची स्थापन करणे गरजेचे आहे. जगात ३२३ लाख हेक्टरवर कापूस लागवड होते. लागवड क्षेत्रापैकी १२९ लाख हेक्टर भारतात आहे. कापसाचे उत्पादन, मगणी, आयात, निर्यात या बाबींवर कृषिमालाचे दर कमी जास्त होतात. हीच बाब कापसासाठी सुद्धा लागू पडते. देशात सुमारे १७०० ते १८०० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होते. त्याचे बाजार मूल्य सुमारे ९० हजार कोटी रुपये होते. कापूस हे देशातील प्रमुख नगदी पीक आहे. साधरण शेती मालाची आवक असणाऱ्या काळात त्याचे भाव कमी असतात. आवकेच्या कालावधीनंतर त्याचे भाव वाढतात. भाववाढीचा शेतकऱ्यांना अंदाज न आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.  शेतकऱ्यांना कापूस दराच्या अंदाजासाठी उत्पादन, आयात, निर्यातीची हंगाम कालावधीत दरमहा आकडेवारी प्रसिद्ध करावी. जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार मंडळाद्वारे प्रत्येक महिन्याला जागितक कापसाचे उत्पादन, मागणी, आयात, निर्यातीची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते.  उत्पादनाचे वेगवेगळे अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) देश पातळीवर तसेच प्रत्येक राज्यात अशा अनेक असोसिएशन कार्यरत आहेत. त्या दरमहा आपले अंदाज देत असतात. परंतु त्या शेतकऱ्यांच्या हिताशी बांधील आहेतच असे नाही. त्यामुळे ते वेगवेगळे अंदाज बांधतात. अनेकदा हे अंदाज चुकीचे ठरतात. कापसाचे अपेक्षित उत्पादन जास्त प्रमाणात दाखविल्यामुळे बाजारात दर पडतात. हंगामाच्या शेवटी याच संस्था उत्पादनाची आकडेवारी बदलतात. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटाक बसतो व व्यापाऱ्यांना याचा फायदा होतो. आकडेवारी महत्त्वाची वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अधिनस्त ऑगस्ट २०२० पूर्वी देशात कापूस सल्लागार मंडळ कापूस उत्पादनाची आकडेवारी जाहीर करत होते. हे मंडळ सरकरने बरखास्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाविषयी काडेवारी महिनानिहाय उपलब्ध होत नाही. ही माहिती शेतकऱ्यांना मिळाल्यास तेजी-मंदीचा अंदाज बांधता येईल व त्याप्रमाणे कापूस विक्रीचे नियोजन करता येईल. 

फुगवलेल्या आकड्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान २०२०-२१ मध्ये कापूस क्षेत्रात वाढ झाली. यामुळे उत्पादन जास्त होईल, हे अपेक्षित होते. परंतु सततचा अतिवृष्टी, गुलाबी बोंड अळी, सततच्या पावसाने मोठा फटका बसला. यामुळे सुरुवातीच्या कापूस उत्पादनाचा अंदाज कमी करणे आवश्‍यक आहे. परंतु यंदा देशात ३५८.५० लाख गाठी (एक गाठी-१७० किलो) कापूस उत्पादनाचा अंदाज वर्तविला आहे. दर डिसेंबरपर्यंत १९७.५० लाख गाठींची आवक झाल्याचे म्हटले आहे. याबाबत कापूस क्षेत्रातील काही जाणकारांच्या मते ही आकडेवारी फुगवून दाखविलेली आहे. जवळपास ६० टक्के कापूस ‘सीसीआय’ व ४० टक्के व्यापाऱ्यांनी खरेदी कल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. २०२०-२१ मध्ये कापसाचा हमीभाव लांब धाग्यासाठी ५८२५ रुपये जाहीर केला आहे. मागील वर्षी कोरोना काळात शेतकऱ्यांना कापूस विक्री करताना आलेल्या अडचणी, जानेवारी २०२१ पासून दरात झालेली घसरण या कारणांमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस विकला. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना अंदाज बांधण्यासाठी सक्षम मार्गदर्शक मंडळाची स्थापन करून मासिक अकडेवारी जाहीर करावी.

कापूस टप्प्याटप्प्याने विकावा हंगामात कापसाच्या दरात तेजी-मंदी नेहमी होत असते. सुरुवातीला खासगी बाजारात कापसाचे दर ४५०० रुपायांपासून होते. ते वाढून काही ठिकाणी ६ हजारांपर्यंत गेले. या पुढेही कासाचे दर सुधारतील, असे संकेत आहेत. त्यामुळे कापूस टप्प्याटप्प्याने विकल्यास फायदेशीर राहील.

‘सीएआय’ने २०२०-२१ साठी व्यक्त  केलेला अंदाज (लाख गाठींत)  १२५  मागील शिल्लक  ३५८.५०  उत्पादन  १४  आयात  ३३०  मागणी  ५४  निर्यात  ११३  शेवटी शिल्लक  राज्यनिहाय कापूस उत्पादनाचा अंदाज (लाख गाठी) पंजाब : १०.५० हरियाना : २०.५० राजस्थान : ३१ गुजरात : ९४ महाराष्ट्र : ८५  मध्य प्रदेश : २० तेलंगणा : ४८ आंध्र प्रदेश : १६ कर्नाटक : २४ तमिळनाडू : ५ ओडिशा : ३ इतर : १

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com