शेततळे, फळबाग लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करा : भुसे

नाशिक : ‘‘‘राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जवळपास ३८ हजार हेक्टर इतकी विक्रमी फळबाग लागवड झाली आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील आकडेवारी समाधानकारक नाही. त्यामुळे शेततळे व फळबाग लागवडीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे,’’ असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.
Meet the objectives of farms, orchards: Bhuse
Meet the objectives of farms, orchards: Bhuse

नाशिक : ‘‘‘राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जवळपास ३८ हजार हेक्टर इतकी विक्रमी फळबाग लागवड झाली आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील आकडेवारी समाधानकारक नाही. त्यामुळे शेततळे व फळबाग लागवडीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे,’’ असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची आढावा बैठक रविवार (ता. २३) शासकीय विश्रामगृह मालेगाव येथे भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन मुंडावरे, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तहसीलदार चंद्रजित राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्र अधिकारी गोकूळ अहिरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरण शिंदे आदी उपस्थित होते. 

रोहयो योजनेतंर्गत शेततळे, फळबाग लागवड या विषयी चर्चा करण्यात आली. मालेगाव तालुक्यात कृषी विभागाने २०२० मध्ये केवळ १०.६० हेक्टरवर लागवड केल्याची, तर २०२१ मध्ये १३८ शेततळे मंजूर असून केवळ २६ कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली.     

  तातडीने प्रस्ताव मंजूर करा

मालेगाव तालुक्यामध्ये या योजनेतंर्गत शेततळे आणि किमान १ हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याच्या सूचना कृषी विभागास देण्यात आल्या. येत्या ८ दिवसांत सर्व शेतकऱ्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत. चालू हंगामात शेतकऱ्यांना शेततळ्याच्या पाण्याचा फायदा होईल, या दृष्टीने नियोजन करावे. डाळिंब लागवडीची शेतकऱ्यांना गरज आहे. त्यानुसार लागवड करावी.  रोहयो अंतर्गतची कामे करताना कृषी विभागास महसूल व ग्रामविकास विभागाने सहकार्य करावे, कृषी विभागाच्या अडचणी सोडविण्यासाठी दरमहा झालेल्या कामांचा आढावा घ्यावा, अशा सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com