मराठा आरक्षणासाठी  केंद्राने वटहुकूम काढावा 

केंद्र सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात वटहुकूम काढावा लागेल. घटनादुरुस्ती करावी लागेल, या बाबत मी जर चुकत असेल तर सत्ताधारी आणि विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावे.
मराठा आरक्षणासाठी  केंद्राने वटहुकूम काढावा  For Maratha reservation The Center should issue an ordinance
मराठा आरक्षणासाठी  केंद्राने वटहुकूम काढावा  For Maratha reservation The Center should issue an ordinance
Published on
Updated on

नागपूर : केंद्र सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात वटहुकूम काढावा लागेल. घटनादुरुस्ती करावी लागेल, या बाबत मी जर चुकत असेल तर सत्ताधारी आणि विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावे. कोरोनाच्या संकटात लोकांना बाहेर पडायला, रस्त्यावर उतरायला लावू नका, असा इशाराही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. ते नागपुरात बोलत होते.  मराठा समाज किती दुःखी आणि व्यथित आहे, हे सरकारला दिसायला पाहिजे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक नेत्यांना भेटलो. त्यासाठी कोल्हापूर आणि नाशिकला मूक आंदोलन केले. मात्र, सरकारने सकारात्मकता दाखवल्याने मूक आंदोलनाला स्थगिती दिली. त्यानंतर हा संवाद दौरा सुरू केला आहे. नेत्यांना आता आरक्षणाच्या पर्यायावर बोलायला पाहिजे. आता अधिवेशन सुरू झाले. सर्व आमदारांनी, मंत्र्यांनी अधिवेशनामध्ये आरक्षणासंबंधी मुद्दे मांडावेत, असे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. मराठा आरक्षणासाठी पहिला पर्याय होता पुनर्विचार याचिका. आता पुढचा पर्याय आहे, मागासवर्गीय आयोग स्थापन करून मराठा समाज मागास आहे, या बाबत सर्व्हे करावा लागेल. हे सर्व राज्य सरकारच्या हातात आहे. मात्र, हे सरकार का करत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मराठा-कुणबी समाज एकच आहे. कुणी आमच्यात भांडणे लावू नयेत. सरकारने या अधिवेशनात ठोस निर्णय घेतला नाहीतर, आम्ही पुन्हा मूक आंदोलन करू, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com