Malegaon factory aims to crush 11 lakh tonnes of sugarcane
Malegaon factory aims to crush 11 lakh tonnes of sugarcane

माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

‘कोरोना’चा प्रादुर्भाव विचारात घेता ऊस तोडणी मजुरांबरोबर अधिकाधिक ऊस तोडणी यंत्रांचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांनी दिली.

माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण आणि सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ १५ आॅक्टोबरपासून सुरू करण्याचा कारखाना प्रशासनाचा मानस आहे. आगामी हंगामात ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव विचारात घेता ऊस तोडणी मजुरांबरोबर अधिकाधिक ऊस तोडणी यंत्रांचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांनी दिली.  

आगामी ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर मिल रोलरचे पूजन सोमवारी (ता. ३) अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे, संचालक योगेश जगताप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री. तावरे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव कारखाना सभासद व कामगारांचे हित जोपासेल. अर्थात साखरेचे दर, दैनंदिन खर्च व घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचा विचार करून शेतकऱ्यांना अधिकाधिक ऊस दर देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करेल. त्यानुसार आगामी हंगामात सुमारे ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. अर्थात तशा पद्धतीने आवश्यक ऊस तोडणी यंत्रणेचे प्रशासनाने करार केले आहेत. संबंधित यंत्रणेला पहिला आगाऊ हप्ता देण्याचे काम सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अंदाजे २० हजार ६४० एकरवर ऊस उपलब्ध होऊ शकतो. तसेच सुमारे चार लाख टन गेटकेन ऊस घेण्याचाही मानस आहे.

यावेळी ज्येष्ठ संचालक केशवराव जगताप, राजेंद्र ढवाण, सुरेश खलाटे, योगेश जगताप, अनिल तावरे, मदनराव देवकाते, नितीन सातव, अॅड.वसंतराव गावडे, स्वप्नील जगताप, सौ. संगीता कोकरे, मंगेश जगताप, बन्सीलाल आटोळे, तानाजी देवकाते, प्रताप आटोळे, सागर जाधव, दत्तात्रेय भोसले, कार्यकारी संचालक विजय वाबळे आदी उपस्थित होते.

यंत्रसामग्रीच्या देखभाल दुरुस्तीला वेग माळेगाव कारखान्याचे महत्त्वाकांक्षी विस्तारीकरण झालेले आहे. त्यानुसार प्रतिदिनी ९ ते १० हजार टन ऊस गाळप होण्यासाठी यंत्रसामग्रीच्या देखभाल दुरूस्तीच्या कामाला वेग आला आहे. अधिकाधिक ऊस गाळप करून साखर उतारा चांगला कसा मिळेल याचाही विचार केला जात आहे. तसेच डिस्टिलरी, वीज निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न होतील, असे श्री. तावरे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com