‘लोकमंगल'च्या हवा प्रदूषणाचे पुन्हा घेणार नमुने

'Lokmangal' air pollution samples again
'Lokmangal' air pollution samples again
Published on
Updated on

सोलापूर : बीबी दारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या चिमणीमुळे परिसरातील शेतीपिके धोक्‍यात आल्याची तक्रार शिरापूर येथील शेतकऱ्यांनी केली होती. या तक्रारीनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सोलापूर कार्यालयाने हवेतील नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात प्रदूषण दुप्पट असल्याचे आढळल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे लोकमंगल कारखान्याला नोटिस बजावण्यात आली. त्यानंतर आम्ही प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केल्याचा दावा कारखान्याने केला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये कारखान्याच्या प्रदूषणाबाबत पुन्हा एकदा नमुने घेण्यात येतील, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली.

शिरापूरमधील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार कारखान्याला ही नोटीस बजावण्यात आली होती. या प्रश्‍नाबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यापूर्वीही एकदा बैठक घेतली होती. या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रशांत भोसले, लोकमंगल कारखान्याचे सतीश देशमुख, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

सध्या सुरू असलेला गाळप हंगाम संपल्यानंतर प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी लोकमंगल कारखाना व्यवस्थापन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या

कारखान्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये. कारखाना प्रशासनाने प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे मान्य केले. परंतु, आत्तापर्यंत शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई मिळावी,  अशी मागणी उमेश पाटील यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com