डायरियाच्या साथीमुळे पशुधन धोक्यात

किल्ले मच्छिंद्रगड, जि.सांगली : वाळवा तालुक्याच्या उत्तरेकडील भागात दूषित चारा, पाण्यामुळे गाई, म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात जीवघेण्या डायरियाची साथ फैलावली आहे. खासगी पशूतज्ज्ञांच्याकडून शेतकरी जनावरांच्यावर उपचार करून त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र पशुसंवर्धन विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
 Livestock at risk due to diarrhea outbreak
Livestock at risk due to diarrhea outbreak

किल्ले मच्छिंद्रगड, जि.सांगली : वाळवा तालुक्याच्या उत्तरेकडील भागात दूषित चारा, पाण्यामुळे गाई, म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात जीवघेण्या डायरियाची साथ फैलावली आहे. खासगी पशूतज्ज्ञांच्याकडून शेतकरी जनावरांच्यावर उपचार करून त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र पशुसंवर्धन विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. 

डायरियाच्या साथीत जनावराचे शेण पाण्यासारखे पातळ होते. शरीरातील ग्लुकोज मात्रा कमी होऊन जनावरांना ग्लानी येण्याचे प्रकार घडू लागले आहेत. अति मलमूत्र विसर्जन झाल्याने त्यातून रक्त पडण्याचे प्रकारही वाढल्याने जनावरांच्या जीवितास धोका आहे. एकीकडे दुधास दर नाही आणि त्यात खर्चिक उपचाराने शेतकरी हतबल झाला असल्याचे दिसून येत आहे. 

दवाखान्यांची कमतरता 

जिल्हा परिषदेअंतर्गातील श्रेणी एकचे रेठरहरणाक्ष, भवानीनगर येथे तसेच राज्य शासनाच्या श्रेणी दोन अंतर्गत येडेमच्छिंद येथे पशुधन दवाखाने आहेत. सेवेचा लाभ फक्त स्थानिक गावांना होतो. घटसर्प, लाळ्या खुरकूत लसीकरणाव्यतिरिक्त वर्षभर दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पशुपालकांना जनावरांच्या आरोग्यविषयक इतर सेवाचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. 

गोठ्यातील नऊ जनावरांना डायरिया झाला आहे. उपचारापोटी सात हजार रुपये खर्च झाले. खासगी पशुतज्ज्ञांकडून वेळीच उपचार केल्याने जनावरांचे प्राण वाचले.  - राहुल पाटील, पशूपालक, किल्ले मच्छिंद्रगड 

पशुपालकांनी संपर्क साधलेला नाही. उपलब्ध औषधानुसार  उपचार केले जातील. दवाखाना कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गावात आठवड्यातून किमान एकवेळ, तसेच गंभीरप्रश्‍नी तातडीने भेट देऊन उपचार केले जातील. शासकीय स्तरावर असलेल्या सेवेचा पशुपालकांनी लाभ घ्यावा.  - डॉ. वसुधा कदम, पशुवैद्यकीय अधिकारी (वर्ग १) पशुवैद्यकीय दवाखाना, भवानीनगर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com