मेळघाटात पशुधन  अधिकाऱ्याच्या १३ जागा रिक्त 

जिल्हा परिषद अंतर्गत मेळघाटातील चिखलदरा व धारणी या दोन तालुक्यांतील पशुधन अधिकाऱ्यांची एकूण १८ पैकी १३ पदे रिक्त आहेत.
मेळघाटात पशुधन  अधिकाऱ्याच्या १३ जागा रिक्त  Livestock in Melghat 13 officer posts vacant
मेळघाटात पशुधन  अधिकाऱ्याच्या १३ जागा रिक्त  Livestock in Melghat 13 officer posts vacant
Published on
Updated on

जामली, जि. अमरावती : जिल्हा परिषद अंतर्गत मेळघाटातील चिखलदरा व धारणी या दोन तालुक्यांतील पशुधन अधिकाऱ्यांची एकूण १८ पैकी १३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील पशुधन शासनाने वाऱ्यावर सोडले की काय, असा प्रश्न मेळघाटातील पशुपालकांना पडला आहे.  मेळघाटातील चिखलदरा व धारणी या दोन तालुक्यांतील पशुधनाची संख्या दोन ते अडीच लाखांच्या घरात आहे. असे असताना चिखलदरा तालुक्याचे पशुधन अधिकारी हे प्रभारी आहेत तसेच त्यांच्याकडे अनेक गावांतील दवाखान्यांचा प्रभार आहे. डॉ. विजयकर यांच्याकडे टेम्ब्रूसोंडा, तेलखार व राहू या गावांचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी कसरत करावी लागते, त्यातूनच कोणत्याही रुग्णालयात वेळेवर पोहोचणे त्यांना शक्य होत नाही.  पावसाळ्यात विविध आजारांनी सध्या तोंड वर काढले आहे. त्यात तोंडखुरी, पायखुरी, एक टांग्या, गर्भपात, हगवण, कावीळ, सर्दी, खोकला, ताप अशा रोगांनी पशुधन ग्रस्त आहे. शासनाच्या विविध योजनेअंतर्गत लसीकरण, जनावरांना टॅग लावणे तसेच सर्व माहिती ऑनलाइन करून शासनाला पाठविणे, अशी कितीतरी कामे करावी लागतात. पण शासनाला याची माहिती वेळेवर पोहोचत नसल्यामुळे पशुमालकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मेळघाटात व्याघ्रप्रकल्पातील जंगल असल्यामुळे येथे पाळीव प्राणी तसेच जंगली प्राणी यात नेहमी संघर्ष होत असून कित्येकदा वाघ, बिबटकडून पाळीव प्राण्यांना जखमी करण्यात येते किंवा त्यांची शिकार होत असते. त्याकरिता पशुधन मालकांना वनविभागाकडून नुकसानभरपाईची तरतूद आहे. पण पशुधन अधिकारी वेळेवर मिळत नसल्यामुळे मेलेल्या जनावरांचा मूल्यमापन करून जनावराची किंमत किती होती, असा दाखला पाहिजे असतो. पण तो वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी या नुकसानभरपाईपासून सुद्धा वंचित राहतो. वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे व त्वरित रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी आता मेळघाटात जोर धरत आहे. आजघडीला धारणीत ३ व चिखलदरात २ डॉक्टर कार्यरत आहेत. १३ पशुधन अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com