लखीमपूर खिरी हिंसाचार; संसदेचे कामकाज स्थगित

लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी (ता. १५) लोकसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना दिल्यानंतर बराच गदारोळ झाला.
Lakhimpur Khiri violence; Parliament adjourned
Lakhimpur Khiri violence; Parliament adjourned
Published on
Updated on

नवी दिल्ली : लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी (ता. १५) लोकसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना दिल्यानंतर बराच गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची मागणी करत राहुल गांधी यांनी हा स्थगन प्रस्ताव दिला. त्याचवेळी खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यसभेत गदारोळ केल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या गदारोळात आणि सततच्या घोषणाबाजीत प्रश्नोत्तराचा तास चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र गोंधळ सुरूच होता. गदारोळ आणि घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाल्याने बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी लखिमपूर खिरी घटनेवरील एसआयटी अहवाल आणि मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दिलेली स्थगन प्रस्तावाची नोटीसीवर चर्चेची मागणी करत गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षांचे खासदारही या मुद्द्यावरून सातत्याने घोषणाबाजी करत होते. त्यामुळे लोकसभेचे कामकाज गुरुवारी ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com