पुणे जिल्ह्यात डीएपीची टंचाई

पुणे : अनेक ठिकाणी डीएपी खते मिळेनासे झाले आहे. शेतकऱ्यांना खते मिळवण्यासाठी कृषी सेवा केंद्र चालकांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने डीएपी खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
Lack of DAP in Pune district
Lack of DAP in Pune district

पुणे : अनेक ठिकाणी डीएपी खते मिळेनासे झाले आहे. शेतकऱ्यांना खते मिळवण्यासाठी कृषी सेवा केंद्र चालकांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने डीएपी खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

रब्बी हंगामात शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हास्तरावरून केलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे १३ हजार ६०९ टन खताची मागणी केली आहे. मात्र, कृषी आयुक्तालयाने शेतकऱ्यांकडील अधिकची मागणी विचारात घेऊन तब्बल १६ हजार २११ मेट्रीक टन खते मंजूर केले आहे. त्यापैकी १ हजार १९० टन खते उपलब्ध करून दिली आहेत. तर १ ऑक्टोबरअखेरपर्यंत तीन हजार ५४३ टन खते शिल्लक होती. सध्या एकूण चार हजार ७३३ टन खते उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाने केला आहे.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने ७ नोव्हेंबरअखेर घेतलेल्या अहवालावरून जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रांनी पॉस मशिनद्वारे २ हजार २२० मेट्रीक टन खताची विक्री केली. तर कृषी सेवा केंद्रांत दोन हजार ५१३ टन खते शिल्लक असल्याची स्थिती आहे. परंतु अनेक ठिकाणी शेतकरी उसासह इतर पिकांना मोठ्या प्रमाणात डीएपीचा वापर करतात. त्यामुळे डीएपीची मागणी वाढत आहे. पुरवठा कमी, मागणी अधिक अशी स्थिती आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तुटवडा भासत असल्याचे चित्र आहे.

पुणे जिल्हा डीलर असोसिएशनचे अध्यक्ष महेश मोरे म्हणाले,`` आमच्या भागात उसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्यामुळे डीएपीला शेतकऱ्याकडून अधिक मागणी आहे. त्यातच कृषी विभागाकडून रासायनिक खताचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने कमी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना डीएपी मिळेनासा झाला आहे. त्यातच खताचे दर वाढले आहेत. डीएपीची मागणी जास्त आहे. त्यामुळे  आम्हालाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.’’     

अनेक शेतकरी डीएपी खताची मागणी करत आहेत. काही दुकानामध्ये खत टंचाई असली, तरी काहींकडे खते उपलब्ध आहेत. त्यामुळे फारशी अडचण येत नाही. मात्र, युरिया व डीएपीची टंचाई असल्याचे दुकानदार सांगत आहेत.

- रघुनाथ शिंदे, शेतकरी, खैरेनगर, ता. शिरूर.

आमच्याकडील अहवालानुसार जवळपास अडीच हजार टन खते शिल्लक आहेत. तरीही डीएपी खताचा तुटवडा भासत असल्यास कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांना लवकरच खते उपलब्ध करून दिली जातील.   - ज्ञानेश्वर बोठे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com