जयवंत लोखंडे यांच्या हळदीच्या ४.११६ किलोच्या उत्पादनाची बाजी

मंडणगडपंचायत समिती कृषी विभागांतर्गत ‘स्पेशल कोकण’ या वाणाचा सर्वांत मोठा हळदीचा गड्डा उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्पर्धेत जयवंत लोखंडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी लागवड केलेल्या हळदीमध्ये ४.११६ किलो वजनाचा गड्डा मिळाला.
Jaywant Lokhande's turmeric 4.116 kg production bet
Jaywant Lokhande's turmeric 4.116 kg production bet

मंडणगड (जि. रत्नागिरी) ः पंचायत समिती कृषी विभागांतर्गत ‘स्पेशल कोकण’ या वाणाचा सर्वांत मोठा हळदीचा गड्डा उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्पर्धेत जयवंत लोखंडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी लागवड केलेल्या हळदीमध्ये ४.११६ किलो वजनाचा गड्डा मिळाला.  पंचायत समितीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातील शेवटच्या हळद काढणी व काढणीपश्‍चात तंत्रज्ञान प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी सभापती सौ. स्नेहल सकपाळ, प्रभारी सहायक गटविकास अधिकारी विशाल जाधव, समीक्षा लोखंडे, नंदा शिंदे, श्री. बर्जे, गजेंद्र पौनीकर, पवन गोसावी, हळद लागवड करणारे प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते.  कृषी विभागांतर्गत स्पेशल कोकण या वाणाची हळद लागवड करणाऱ्या वजनदार आणि सर्वांत मोठा हळदीचा गड्डा उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाची रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सभापती सौ. सपकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रथम क्रमांक जयवंत लोखंडे यांच्या हळद गड्ड्याला मिळाला असून, त्याचे वजन ४.११६ किलो आहे. त्यांना पुरस्कारापोटी रोख रक्कम २५०० रुपये व स्मृतिचिन्ह प्राप्त झाले.  द्वितीय क्रमांक सौ. विभा दरीपकर (संजीवनी स्वयंसाह्यता समूह, वेळास) यांना मिळाला असून, त्यांच्या हळद गड्ड्याचे वजन ४.०६६ किलो असून, त्यांना १५०० रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह मिळाले. तर तृतीय क्रमांक सुरेश लोखंडे (कुंबळे) यांना मिळाला असून, गड्ड्याचे वजन ३.८०० किलो आले आहे. त्यांना रोख रक्कम एक हजार आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. उत्तेजनार्थ क्रमांक संजय दुर्गवले (पेवे), आत्माराम कदम यांना देण्यात आला. पुरस्कार वितरणप्रसंगी हळद काढणी, हळद कंद व हळकुंड विगतवारी, हळकुंड उकळणी, हळकुंड वाळवणी, हळकुंड पॉलिश करणे, तसेच हळकुंडापासून रोपे तयार करण्याचे प्रात्यक्षिक कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी दाखवले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरेश लोखंडे, समीक्षा लोखंडे, संदेश लोखंडे, जयवंत लोखंडे यांनी सहकार्य केले. 

हळद पावडर ही रोजच्या गरजेची वस्तू आहे. या प्रकल्पातील उत्पादित हळदीसाठी सोशल मीडियाच्या, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपण प्रसिद्धी दिली तर मार्केटिंगचा प्रश्‍न सुटू शकतो.  - सौ. स्नेहल सकपाळ, सभापती, पंचायत समिती 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com