शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक : डॉ. देवसरकर

परभणी ः ‘‘उत्पन्नाची जोखीम कमी करण्यासाठी केवळ शेतीवरच अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी आर्थिक स्थैर्यासाठी शेतीपूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी केले.
 It is necessary to add supplementary business to agriculture: Dr. Devasarkar
It is necessary to add supplementary business to agriculture: Dr. Devasarkar
Published on
Updated on

परभणी ः ‘‘उत्पन्नाची जोखीम कमी करण्यासाठी केवळ शेतीवरच अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी आर्थिक स्थैर्यासाठी शेतीपूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि औरंगाबाद येथील कृषी सारथी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ‘नाबार्ड’पुरस्कृत प्रशिक्षण जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बुधवार (ता. ४) आणि गुरुवारी (ता. ५) आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. देवसरकर होते. मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. व्ही. बी. कांबळे, कृषी सारथी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक नारायण जराड, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. जी. डी. गडदे, कीटकशास्‍त्रज्ञ डॉ. डी. डी. पटाईत, डॉ. मधुमती कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. गडदे म्हणाले, ‘‘विद्यापीठातर्फे नवीन विकसित वाणांची शेतकऱ्यांनी लागवड करावी. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळवता येईल. प्रशिक्षणात माहिती घेतलेल्‍या कृषी तंत्रज्ञानाचा वापर करावा. हरभरा व गहू उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, हरभरा पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन, रब्बी पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन, डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान, द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान, डाळिंब व द्राक्ष पिकांचे कीड व्यवस्थापन, यांत्रिकीकरण व त्यांचे महत्त्व, मधमाशी पालन, शेळीपालन व व्यवस्थापन, मुऱ्हा म्हैसपालन, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आदी विषयांवर प्रात्याक्षिकांव्दारे प्रशिक्षण देण्यात आले.`` 

शेतकऱ्यांनी चर्चेत विचारलेल्‍या प्रश्‍नांना विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात  वरुड  (जि. जालना) येथील २७ शेतकरी सहभागी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com