वर्धा जिल्ह्याचा सिंचन आराखडा निश्चित

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यात १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणल्या जाणार आहे.
Irrigation plan of Wardha district fixed
Irrigation plan of Wardha district fixed
Published on
Updated on

वर्धा : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यात १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणल्या जाणार आहे. यासाठी तालुकानिहाय सिंचन आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत निश्चित करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सर्व संबंधित विभागांची विशेष आढावा बैठक नुकतीच घेतली. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रवी वऱ्हाडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सी. ससाने, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता नीतू चव्हाण, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिल्यास कृषी उत्पादन वाढून शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. बैठकीत चर्चेनंतर जिल्ह्याचा सिंचन आराखडा निश्चित करण्यात आला. या आराखड्याप्रमाणे जिल्ह्यात १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष सिंचनाखाली येणार आहे. 

सिंचन आराखड्याप्रमाणे तालुकानिहाय सिंचनाखाली येणाऱ्या क्षेत्रामध्ये वर्धा तालुका १६ हजार ५७१ हेक्टर, सेलू २० हजार ५८० हेक्टर, देवळी ३३ हजार ९९७ हेक्टर, आर्वी  १४ हजार  ७८२ हेक्टर, आष्टी ९ हजार ५१६ हेक्टर, कारंजा ३ हजार २८ हेक्टर, हिंगणघाट ७ हजार ९८० हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यात ८ हजार ८२ हेक्टर प्रत्यक्ष सिंचनाखाली येणार आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघु  प्रकल्प तसेच लघु पाटबंधारे योजना, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, सिमेंट नाला बांधकाम या सर्व प्रकल्पाची उपलब्ध सिंचन क्षमता ओलीतासाठी वापरण्यात येणार आहे.

विहिरींमधून ४५ हजार हेक्टर ओलीत सिंचनासाठी सुलभ पर्याय म्हणून आजही मोठ्या प्रमाणावर विहिरींचा वापर केल्या जातो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे आजमितीस सिंचनासाठी ४५ हजार इतक्या विहिरी आहेत. एका विहिरीमधून सरासरी १ हेक्टर इतके क्षेत्र ओलीत केल्या जाते. याप्रमाणे विहिरींमधून ४५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणले जाते. जिल्ह्यात सर्वाधिक ७ हजार ९४० विहीरी हिंगणघाट तालुक्यात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com