`जिनिंग कारखान्यांत कामगंध सापळे लावा`

परभणी ः ‘‘क्रॉपसॅप अंतर्गत केलेल्या जिनिंग कारखान्यांच्या सर्वेक्षणात गुलाबी बोंड अळीच्या अवस्था काही प्रमाणात आढळून आल्या आहेत.
Install Kamgandh traps in ginning factories
Install Kamgandh traps in ginning factories
Published on
Updated on

परभणी ः ‘‘क्रॉपसॅप अंतर्गत केलेल्या जिनिंग कारखान्यांच्या सर्वेक्षणात गुलाबी बोंड अळीच्या अवस्था काही प्रमाणात आढळून आल्या आहेत. त्यामुळे या अळीचे जीवन चक्र खंडित करण्यासाठी जिनिंग कारखान्यांत  कामगंध सापळे लावावेत,’’ असा सल्ला कृषी विद्यापीठांतील किटकशास्त्रज्ञांनी दिला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभागातील कीटकशास्त्रज्ञांनी  क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत विविध ठिकाणच्या जिनींग कारखान्यांमध्ये जाऊन  सर्वेक्षण केले. त्यावेळी तेथे गुलाबी बोंड अळीच्या अवस्था थोड्या फार प्रमाणात दिसून आल्या. मागील २ ते ३ वर्षांपासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनेक शेतकरी कपाशीच्या फरदडचे उत्पादन घेतात. त्यामुळे बोंड अळीच्या जीवनक्रमात खंड पडत नाही, असे किटकशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

या अळीचा जीवनक्रम लक्षात घेता अंडी, अळी, कोष, पतंग या चार अवस्था आहे. नुकसानकारक अळी अवस्था तिचा पूर्ण जीवनक्रम बोंडात करते. या अवस्थेत किडींचे व्यवस्थापन करणे अवघड जाते. प्रक्रिया केल्यानंतर खराब सरकीमध्ये जिनिंग कारखान्यात आढळून आलेल्या अळी-कोष अवस्थेचे पतंग अवस्थेत रूपांतर होते. कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. अनंत लाड, डॉ. संजोग बोकन, डॉ.राजरतन खंदारे यांनी  मार्गदर्शन केले.

पुढील हंगामातील धोका टाळा

जास्तीत जास्त कामगंध सापळे जिनिंग कारखान्यांमध्ये लावल्यास नर पतंग आकर्षित होऊन त्यामध्ये अडकतात. ते जमा करून नष्ट करावेत. त्यामुळे नर मादी पतंग मिलनामध्ये अडथळा होऊन पुढील उत्पत्तीस आळा बसण्यास मदत होईल. पुढील हंगामातील कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिनींग कारखान्यांमध्ये कामगंध सापळ्यांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com