नगर जिल्ह्यातील टॅंकर घोटाळ्याची चौकशी सुरू

नगर जिल्ह्यामध्ये टंचाईच्या काळात पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरमधून दोन वर्षांत सुमारे १०२ कोटीचा घोटाळा करून सरकारी रक्कम हडप केल्याच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
Inquiry into tanker scam in Nagar district begins
Inquiry into tanker scam in Nagar district begins

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये टंचाईच्या काळात पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरमधून दोन वर्षांत सुमारे १०२ कोटीचा घोटाळा करून सरकारी रक्कम हडप केल्याच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आजपासून शुक्रवार (ता. २८) टॅंकर घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे. यामुळे टंचाई विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पाणीपुरवठा करणाऱ्या संस्था रडारवर आल्या आहेत.

पारनेर तालुक्यात लोकजागृती सामाजिक संस्थेने माहिती अधिकारातून माहिती मिळवल्यानंतर प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने याबाबत न्यायालयात तक्रार केली होती. नगर जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात दुष्काळी स्थिती होती. या काळात लोकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी सुरू असलेल्या टॅंकरचा आकडा ९५० पर्यंत गेला होता. त्या वर्षी तीन महिन्यांत पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरवर तब्बल १०२ कोटी रुपये वाटप केले. पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या वाहतुकीचे अंतर बरोबर आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी जीपीएस यंत्रणा कार्यान्वित होती. शिवाय जेवढ्या खेपाच्या रकमावाटप केल्या तेवढ्या रकमा झाल्या का, यासह अन्य बाबतींत शंका असल्याने पारनेर येथील लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे व बबन कवाद यांनी माहिती अधिकारातून माहिती घेतली. त्यात त्यांना तफावत आढळली. जीपीएस यंत्रणेचे दुय्यम अहवाल, वाढलेल्या खेपा, अंतर व वेळेत तसेच टॅंकरची पाणी वाहतूक क्षमतेत तफावत असल्याचे दिसून आले.

पाच वर्षांची चौकशी टॅंकर घोटाळ्याबाबत रामदास घावटे व बबन कवाद यांनी माहिती घेऊन २०१९-२० या वर्षातील चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र नगर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत टॅंकर, पाणीपुरवठ्यावर कोट्यवधींचा खर्च झाला आहे. त्यामुळे एक वर्षाची नव्हे तर मागील पाच वर्षांची चौकशी केली जाणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. चौकशी पथकाने मागणी केल्यानुसार कागदपत्रे उपलब्ध करून देत संबंधितांनी हजर राहण्याचे आदेशात नमूद केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com