
नाशिक : जिल्ह्यातील जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान २७०४.८० मिलिमीटर इतके आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात २५७७.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरणीयोग्य ओल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, खते व बियाण्यांसाठी भांडवल नसल्याने अडचणी कायम आहेत. त्यातच बियाण्यांची नसलेली उपलब्धता व दरवाढीचा फटका पेरणीला बसत आहे.
अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध भांडवलानुसार गटांच्या माध्यमातून मे महिन्यात खते व बियाणे वितरित केली. त्यामुळे कामकाजाला दिसत आहे. चालू वर्षी मक्याच्या प्रस्तावित क्षेत्रात वाढ होऊन जिल्ह्यात ५७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षाप्रमाणे बीज प्रक्रियेच्या नावाखाली शेतकऱ्यांची नाराजी आहे. त्यामुळे ४५००० क्विंटल बियाणे मागणीच्या तुलनेत १६१२० क्विंटल बियाण्याची विक्री झाली आहे. मात्र, मक्याला नसलेला दर व खरेदीची हमी नसल्याने पेरणीचा मोर्चा सोयाबीनकडे वळवलेला आहे.
बियाण्यातील दरवाढ व बियाणे टंचाई हा मोठा प्रश्न आहे. प्रामुख्याने सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने महाबीजसह खासगी कंपन्यांनी दरात वाढ केली आहे. महाबीजकडे सोयाबीन २२,००० क्विंटल मागणी होती. त्या तुलनेत ५८६० क्विंटल बियाणे आवंटन मंजूर होऊन ४००० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. तसेच खासगी कंपन्यांकडूनही बियाणे उपलब्ध झाले असले तरी दरवाढीमुळे १२८१० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे.
मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने दर वाढवलेले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे जिल्ह्यात प्रस्तावित ५१ हजार ४५९ हेक्टर क्षेत्रापैकी १७ हजार २८८ क्षेत्रावर म्हणजे २८ टक्के पेरणी झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सोयाबीन बियाणे स्थानिक पातळीवर उगवण क्षमता तपासून वापरत आहेत. मात्र, हे ही कमीच पडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कापूस लागवड सुरुवातीला बियाणे उपलब्धतेअभावी संथ होती. जिल्ह्यात कापूस बियाण्यांची मागणी ८१० क्विंटल असताना अवघे ३८७ क्विंटल बियाणे विक्री झाले आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर दरवाढ व हाती नसलेले भांडवल पेरणीला अजून चांगली गती येण्यास अडसर ठरत आहे.
चालू वर्षी सोयाबीन बियाणे आम्ही घरचेच पेरले आहे. दोन दिवसांपूर्वी बाकी मका बियाणे किमतीमध्ये खूप तफावत एकाच बियाणे कंपनीने ३ प्रकार बाजारात आणले. पहिल्या पावसात ११०० पर्यंत असलेले बियाणे पाऊस सुरू झाल्यानंतर अगदी १४०० पर्यंत विक्री करत असून मागील वर्षासारखी वाढ कायम आहे. - गणेश निंबाळकर, शेतकरी, दहीवद, ता. चांदवड
पश्चिम पट्ट्यात सोयाबीन पीक हे कमी प्रमाणात घेतले जाते. त्यातच या वर्षी सोयाबीन बियाणे मिळण्यास अडचण येत आहे. मागील हंगामात सोयाबीन काढणीच्या वेळेस पाऊस झाल्यामुळे सोयाबीन काळी पडलेली होती. त्यामुळे आहे ते बियाण्याची उगवण क्षमता कमीच असल्याने बियाणे टंचाई अन् त्यात झालेली दरवाढ अडचणीची ठरत आहे. - भारत पिंगळे, शेतकरी, दरी मतोरी, जि. नाशिक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.