कोरेगाव भीमाचा इतिहास पाठ्यपुस्तकात हवा : रामदास आठवले

कोरेगाव भीमाच्या लढाईचा इतिहास शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
कोरेगाव भीमाचा इतिहास पाठ्यपुस्तकात हवा : रामदास आठवले History of Koregaon Bhima should be in the textbook: Ramdas Athavale
कोरेगाव भीमाचा इतिहास पाठ्यपुस्तकात हवा : रामदास आठवले History of Koregaon Bhima should be in the textbook: Ramdas Athavale
Published on
Updated on

पुणे : देशात समता प्रस्थापित झाली पाहिजे. दलित आणि सवर्ण यांच्यात एकजूट  झाल्यास देशाचा वेगाने विकास होईल. कोरेगाव भीमाच्या लढाईचा इतिहास शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा, या मागणीसाठी आपण शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.   कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनानिमित्त ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रसार माध्यमांशी रामदास आठवले बोलत होते.    कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजय स्तंभाच्या परिसराचा विकास करण्याचा आराखडा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर झाला होता. त्यानुसार या परिसराचा विकास करावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.  नवीन वर्षात रिपब्लिकन पक्ष मजबूत करणे हाच आमचा संकल्प असून, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष; रिपब्लिकन पक्ष, या अर्थाने मी रिपब्लिकन ही आमची घोषणा आहे, असेही आठवले यांनी जाहीर केले. या वेळी रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com