
मोवाड, जि. नागपूर : एका एकराला ६० हजार रुपयांचा खर्च आणि ४० हजार रुपयांचे उत्पन्न नरखेड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या डायरीत लिहिले आहे. होय! नागपुरी संत्री अशी जगभर ओळख असलेल्या संत्र्याच्या हजारो उत्पादकाने जगायचे कसे, या विचाराने तालुक्यातील असंख्य संत्रा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
भावात उठाव नाही नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात संत्र्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागातील १०७१२ हेक्टर, अर्थात २६७८० एकर क्षेत्र संत्रा लागवडीखाली आहे. तज्ज्ञांनुसार, सरासरी हजारो शेतकरी, अर्थात हजारो शेतकरी कुटुंबीय या फळपिकांवर अवलंबून आहेत. आंबिया बहराची संत्री दोन महिन्यांपूर्वी विक्रीला आली. तीच कोसळलेले भाव घेऊन. आता हंगाम संपत आहे तरी भावात उठाव नाही.
का कोसळले भाव? दरवर्षीच्या तुलनेने या वर्षी संत्रा फळाचे अधिक उत्पादन झाले. ५० एमएम आकारापेक्षा लहान संत्री प्रक्रियेसाठी वापरले जातात. त्या पेक्षा मोठ्या आकाराची संत्री विकली जाते. केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र, तेलंगणा आणि दिल्ली ही राज्य टेबल फ्रूटची आहे. तेथे सातत्याने पाऊस असल्याने मागणी नव्हती. बांगलादेशात निर्यात होणाऱ्या संत्र्यांनाही अपेक्षेनुसार भाव मिळत नाही. मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये संत्रा लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे ३० ते ३५ हजार प्रतिटन असलेली संत्र्याची मागणी आता १५ ते १७ हजार रुपये टन या भावाने विकली जात आहे.
उत्पादन, खर्च आणि नफा एका हेक्टरमध्ये २७७ झाडे असतात. एका एकरात ११०, एका झाडामागे ५०० रुपयांचा खर्च आहे. सरासरी उत्पादन एका एकरी दोन-तीन टन. त्यानुसार प्रति एकर ३० ते ३५ हजार रुपयाचे उत्पन्न आणि ६० हजार रुपये खर्च, अशी स्थिती आहे.
काटोलचा प्रक्रिया प्रकल्प ३० वर्षांपासून बंद नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात १०७१२ हेक्टरमध्ये संत्रा बागा आहेत. उत्पादकता हेक्टरी सात ते आठ टनावर आहे. काटोलचा मल्टीलाइन प्रक्रिया प्रकल्प व ५०० टन क्षमतेचे शीतगृह २५ वर्षांपासून बंद आहे.
प्रक्रिया उद्योग व शीतगृहाची उपलब्धता असती तर उत्पादकाची वाताहत झाली नसती. या सुविधा नसल्याने संत्रा कमी भावात विकला जातो. त्यामुळे उत्पादकांचा भ्रमनिरास झाला आहे. - हिराचंद कडू, संत्रा उत्पादक शेतकरी, मोवाड
नाबार्डच्या माध्यमातून कोल्ड स्टोअरेज व वेअरहाउस तयार करण्यासाठी व प्रक्रिया प्रकल्प संत्रा उत्पादक भागात द्यावे. ज्यामुळे संत्री स्टोअर करून भाव वाढल्यावर संत्री विकता येईल. - ललित खंडेलवाल, समन्वयक युवासेना, काटोल विधानसभा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.