भुईमूग काढणी अंतिम टप्प्यात,  बाजार बंदमुळे विक्रीचा प्रश्‍न

अमरावती, नागपूर, यवतमाळ, कारंजा (वाशीम) अकोट (अकोला) बाजार समित्यांमध्ये हंगामात मोठ्या प्रमाणावर भुईमुगाची आवक होते.यवतमाळ जिल्ह्यात यंदा १२ हजार हेक्‍टरवर उन्हाळी भुईमुगाची लागवड करण्यात आली होती.
भुईमूग काढणी अंतिम टप्प्यात,  बाजार बंदमुळे विक्रीचा प्रश्‍न Groundnut harvesting in final stage, Question of sale due to market closure
भुईमूग काढणी अंतिम टप्प्यात,  बाजार बंदमुळे विक्रीचा प्रश्‍न Groundnut harvesting in final stage, Question of sale due to market closure
Published on
Updated on

नागपूर :  कोरोना निर्बंधामुळे विदर्भातील बहुतांश बाजार समित्या बंद असल्याने भुईमूग विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अमरावती, नागपूर, यवतमाळ, कारंजा (वाशीम) अकोट (अकोला)  बाजार समित्यांमध्ये हंगामात मोठ्या प्रमाणावर भुईमुगाची आवक होते.  यवतमाळ जिल्ह्यात यंदा १२ हजार हेक्‍टरवर उन्हाळी भुईमुगाची लागवड करण्यात आली होती. मात्र बियाणे निकृष्ट निघाल्याने दारव्हा, पुसद उपविभागातील अनेक गावांमध्ये भुईमुगाला शेंगधारणाच झाली नाही. त्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर झाला आहे. भुईमुगा संदर्भात सर्वाधिक तक्रारी दारव्हा उपविभागात करण्यात आल्या आहेत. याची दखल घेत कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञांसह कृषी विभागाने शिवाराची पाहणी केली. फुलधारणेच्या वेळी झालेली तापमानातील वाढ आणि त्याच वेळी पिकाला पाणी देण्यात आले. त्यामुळे अपेक्षित शेंगधारणा झाली नसल्याचा अंदाज कृषी तज्ञांनी प्रक्षेत्र भेटीअंती वर्तविला आहे आहे.  अमरावती जिल्ह्यात देखील शेंगांचा अपेक्षित दर्जा तापमान वाढीच्या परिणाम मिळाला नसल्याचे सांगितले जाते. अकोला, नागपूर, वाशीम जिल्ह्यात देखील कमी उत्पादकता आणि शेंगांचा अपेक्षीत दर्जा नसल्याची चर्चा आहे. काही भागात शेतकऱ्यांनी भुईमुगाची काढणी केली. मात्र बाजारपेठ लॉकडाउन असल्याने शेंगांची विक्री कशी करावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.  वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत ७०००, अमरावती बाजार समितीत ५०००,  यवतमाळ बाजार समितीत ३५०० तर नागपूर बाजार समिती देखील तीन हजारांवर भुईमूग पोत्यांची आवक होते. परंतु निर्बंधांमुळे शेतमाल वाहतुकीत अडचणी निर्माण होत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कोरोना चाचणी अहवाल मागितला जात आहे. त्याच्या परिणामी भुईमूग शेंग विक्री प्रभावित  झाली आहे.

प्रतिक्रिया अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सध्या भुईमूग शेंगांचा हंगाम असल्याने बाजार समितीत आवक होणे अपेक्षित होते. परंतु निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना बाजार समित्यांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही, तर काही ठिकाणी बाजारच बंद आहेत. दर्जानुसार यंदाच्या हंगामात भुईमूग शेंगाचे दर ४ हजार ते ५३०० रुपये राहण्याची शक्यता आहे. राज्यातच प्रक्रिया उद्योजकांची मागणी राहते. आवक वाढल्यास गुजरातमध्ये विक्री होते.  मुन्ना सोनी, व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती

प्रतिक्रिया दोन एकरावर भुईमूग लागवड होती. तीन हजार रुपये प्रति बॅग प्रमाणे सात बॅग बियाणे लागले. सहा रुपये प्रति किलो भुईमूग उपटण्याचा   खर्च आला. हंगामात दोन एकरासाठी ७० हजार रुपये खर्च झाले. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत पीक पिवळे पडल्याने २० क्विंटल ओल्या शेंगांचे उत्पादन झाले. वाळल्यानंतर याचे वजन अवघे आठ क्विंटल होईल. भुईमूग तेलाला दोनशे रुपये किलोचा दर आहे. मात्र शेंगांची खरेदी अवघ्या ४०० हजार ते ४ हजार ५०० रुपये दराने होत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चाची भरपाई देखील, या वर्षी शक्य नाही.  - दिलीप विद्याधर आखरे, शेतकरी,  वारखेड, ता. तेल्हारा, जि.,अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com