मेळघाटातील ग्रामसभा कागदावर

ग्रामसेवकांच्या मनमानीने कारभाराने मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील ग्रामसभा कागदोपत्री होत आहेत.
Gram Sabha in Melghat on paper
Gram Sabha in Melghat on paper

चिखलदरा, अमरावती : ग्रामसेवकांच्या मनमानीने कारभाराने मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील ग्रामसभा कागदोपत्री होत आहेत.  ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाल्याने सभेत ग्रामीण भागातील महिला व अन्य वंचित घटकांना आपल्या जीवनाशी संबंधित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी निर्णयप्रक्रियेत सहभाग घेता येतो. त्यातूनच कामकाजातील पारदर्शकता व सामूहिक यश मिळविता येते. परंतु मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यात मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे या प्रक्रियेची पुरती वाट लागली आहे. अनेक गावात प्रत्यक्ष आमसभा न घेता त्या कागदोपत्रीच तयार झाल्याचा अहवाल तयार होतो. एका वर्षांत सहा सभा घेण्याचे बंधनकारक असताना येथील गावांत एकही सभा झालेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आमसभा तर सोडाच साधी मासिक सभाही अनेक गावांमध्ये होत नाही. जेथे ग्रामसेवक सहा-सहा महिने गावांत ढुंकूनही पाहत नाहीत तेथील नागरिकांची स्थिती कशी असेल याची कल्पनाच करवत नाही.  तालुक्यातील काही गावात कधीच अधिकाऱ्यांचे दौरे होत नाहीत. त्यामुळे या गावातील ग्रामसेवकांची मनमानी चालत असल्याने आदिवासी बांधवांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. मेळघाटात झालेल्या ग्रामसभेची सविस्तर चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 

‘मेळघाटातील ग्रामसभा व्हाव्यात इन कॅमेरा’  मेळघाटातील अनेक गावात ग्रामसभा होत नाहीत. त्यामुळे या भागातील सामान्य आदिवासी बांधवांची कोणतीच कामे होत नाहीत. ग्रामसभा ग्रामसेवक फक्त कागदोपत्री दाखवीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घ्यावी व मेळघाटातील ग्रामसभा इनकॅमेरा व्हाव्यात, अशी मागणी आमची केली असल्याचे पंचायत समिती हतरूचे सदस्य नानकराम ठाकरे यांनी सांगितले. 

ग्रामसेवकांचे अप-डाउन  चिखलदरा तालुक्यात ५३ ग्रामपंचायती असून त्यासाठी ३८ ग्रामसेवकांची नेमणूक करण्यात आली. अपवाद वगळता ग्रामसेवक बाहरेगावहून ये-जा करीत असल्याने त्यांना गावाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. काही ग्रामसेवक सहा-सहा महिने बेपत्ता असतात ते कधीच ग्रामसभा व मासिक सभा घेत नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. 

 

   

   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com