सोशल मिडियातून बोकडांचे मार्केटींग

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सध्या गावोगावी भरणारे बोकड बाजार ठप्प असले तरी सोशल मीडियाद्वारे सुरू असणारी ऑनलाइन चौकशी मात्र वेगात आहे.
Goat Farming
Goat Farming
Published on
Updated on

कोल्हापूर: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सध्या गावोगावी भरणारे बोकड बाजार ठप्प असले तरी सोशल मीडियाद्वारे सुरू असणारी ऑनलाइन चौकशी मात्र वेगात आहे. ग्रुपच्या माध्यमातून थेट खरेदी-विक्री होत नसली तरी हव्या त्या वैशिष्ट्याच्या बोकडाची चौकशी मात्र या ग्रुपद्वारे सातत्याने होत आहे. बोकडांच्या माहितीसाठी फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुपचा वापर वाढला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून बोकडांची माहिती  घेतली जाते. यानंतर प्रत्यक्ष भेटी देऊन त्याची खरेदी-विक्री सुरू असल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाउनचे चित्र आहे. या काळातच बकरी ईद आल्याने जिल्हा तालुका स्तरावरचे बोकडाचे बाजार भरले नाहीत. परिणामी कुर्बानीसाठी चांगले बोकड शोधण्यासाठी शोध मोहीम राबवावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर खास गोट फार्मसाठी अनेक व्हॉट्सअप, फेसबुक ग्रुपचा आधार ठरत आहेत.   या ग्रुपमधून हवे असलेल्या बोकडाची मागणी करण्यात येते. यामध्ये बोकडाचे वजन व अन्य वैशिष्ट्यांची मागणी होत आहे . त्याला हजारो कमेंट्सद्वारे माहिती देण्यात येत आहे. त्याचे फोटो अपलोड केले जात आहेत. व्हॉट्सअप फेसबुक आणि सोशल मीडियावर शेळी मेंढी पालन करणाऱ्यांचे अनेक ग्रुप कार्यरत आहेत.  या ग्रुप्सचे काही लाख सदस्य आहेत. या ग्रुपवर वर्षभर शेळी, मेंढीच्या पालनाविषयी चर्चा होत असते. गेल्या काही दिवसांपासून बकरी ईदसाठी असणाऱ्या बोकडांची माहिती देण्या-घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये काही व्यापारी ही सहभागी आहेत. यातून माहितीची देवाण घेवाण होत आहे. कुर्बानीसाठी बोकडांचा शोध घेताना जवळचे गाव पाहिले जात आहे. बोकड पसंत पडल्यास व्यवहार ठरवण्यासाठी मात्र प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊनच खरेदी होत आहे. प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून बोकडांची उपलब्धता कळते. जर एखादा बोकड पसंत पडला तर ग्राहक प्रत्यक्षात येऊन त्याची वैशिष्ट्ये पसंत असली तरच खरेदी करतो. ऑनलाइन व्यवहार होत नाहीत. सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीत माहिती मिळवण्यासाठी असे ग्रुप फायदेशीर ठरत आहेत.  - संदीप कोळी, शेळीपालक, निपाणी

सोशल मीडिया ग्रुपवरून होणाऱ्या चौकशीत प्रत्यक्ष ग्राहकाबरोबरच व्यापारीही ही सहभागी होत आहेत. लॉकडाउनमुळे लांबून वाहतूक करणे अशक्य असल्याने जवळपासचे ग्राहक व व्यापारी बोकडांची चौकशी करताना जादा प्रमाणात दिसत आहेत.  - सुनील देसाई, गोट फार्म व्यावसायिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com