राष्ट्रीय पातळीवर 'फुले १०००१’ प्रथम 

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने शोधलेली ‘फुले १०००१’ उसाची जात देशातील उष्णकटीबंध भागासाठी पहिल्या क्रमांकावर आली आहे.
cane
cane
Published on
Updated on

पुणे: पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने शोधलेली ‘फुले १०००१’ उसाची जात देशातील उष्णकटीबंध भागासाठी पहिल्या क्रमांकावर आली आहे. त्यामुळे उत्तर भारताच्या स्पर्धेला तोंड द्यायचे असल्यास राज्यात या जातीची लागवड वाढवावी लागेल, अशी माहिती राज्याचे ज्येष्ठ ऊस पैदासकार डॉ. सुरेश पवार यांनी दिली. 

पाडेगावमध्ये डॉ. पवार यांनी अथक परिश्रम घेत उसाच्या ‘कोएम २६५’ व ‘एमएस ६०३’ या जातींचा संकर घडवून आणला होता. त्यापासून २०१० मध्ये ‘फुले १०००१’ नवी जात तयार झाली. पुढे सतत सात वर्षे राज्यभर चाचण्या घेण्यात आल्या व ३१ मे २०१७ मध्ये या जातीला मान्यता दिली गेली. 

विशेष म्हणजे अखिल भारतीय ऊस संशोधन प्रकल्पाच्या अंतर्गत देशात झालेल्या २४ पैकी १४ भागांमध्ये ही जात पहिल्या क्रमांकावर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशासाठी ‘फुले १०००१’ जातीची शिफारस करण्यात आली आहे. 

‘‘राज्यात पूर्वहंगामी आणि सुरू हंगामासाठी साखर कारखान्यांना ‘फुले १०००१’ ही जात वरदान ठरू शकते. जादा उत्पादन आणि जादा साखर उतारा असलेली ही जात १० ते १२ महिन्यात हाती येते. देशपातळीवर झालेल्या चाचण्यांमध्ये ही जात आता पहिल्या क्रमांकावर आली आहे. 'को८६०३२' जाती पेक्षा १५ टक्के आणि 'कोसी६७१' जाती पेक्षा ३० टक्के जादा साखर उत्पादन देण्याची क्षमता या जातीत आहे. याशिवाय हेक्टरी सरासरी दीडशे टनापर्यंत उत्पादन मिळू शकते,’’ असे डॉ. पवार यांनी स्पष्ट केले. 

“मी अतिशय कष्टपूर्वक ‘फुले १०००१’ची निर्मिती केली आहे. सध्या एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र या जातीने व्यापले आहे. तरी देखील या जातीचा पूर्ण क्षमतेने वापर केल्याचे दिसत नाही. 'बारामती अॅग्रो' साखर कारखान्याने मात्र पहिल्यापासून ‘फुले १०००१’ विश्वास दाखवला. सतत चाचण्या घेतल्या व प्रसार देखील केला. त्या तुलनेत राज्यातील इतर कारखान्यांनी या जातीला पूर्ण क्षमतेने जवळ केलेले नाही. त्यामुळे शक्य तेथे या जातीचा प्रसार ताकदीने करण्याची गरज आहे," असेही डॉ.पवार म्हणाले.  प्रतिक्रिया सर्वात जास्त साखर उतारा देणारी ‘फुले १०००१’ एक दिवस देशात अव्वल ठरेल याची खात्री मला होती. अखिल भारतीय ऊस संशोधन प्रकल्पाच्या राष्ट्रीय कार्यशाळेत ही जात पहिली आल्याचा मला आनंद आहे. मात्र, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ‘फुले १०००१’ पोहचून त्यांचे उत्पन्न वाढल्यास मला खरे समाधान मिळेल.  - डॉ.सुरेश पवार, निवृत्त वरिष्ठ ऊस पैदासकार व ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र (पाडेगाव, ता.फलटण, जि.सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com