पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार लाखांवर जनावरे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत सुरू असलेल्या ६६८ चारा छावण्यांमध्ये अजूनही ४ लाख ४० हजार ७८८ जनावरे दाखल आहेत. दुष्काळाचे संकट किती गडद आहे हे छावणीत दाखल असलेल्या जनावरांच्या संख्येने अधोरेखित होते. 

मराठवाड्यात यंदा चारा, पाण्याची तीव्र टंचाई असल्याने जनावरांच्या पोषणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे दावणीला चारा किंवा चारा छावणी सुरू करण्याची मागणी पुढे आली. त्यापैकी चारा छावणीचा पर्याय स्वीकारण्यात आला. शासनाकडून मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व परभणी या पाच जिल्ह्यांत ११५३ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती.

२४ जूनअखेर त्यापैकी ६६८ चारा छावण्या सुरू होत्या. त्यामध्ये औरंगाबादमधील १४, जालन्यातील ३१, परभणीतील १, बीडमधील ५३९ व उस्मानाबाद जिल्ह्यातील ८३ चारा छावण्यांचा समावेश आहे. या छावण्यांमध्ये मोठी ४ लाख ६ हजार ८२७ तर लहान ३३,९६१ अशी मिळून ४ लाख ४० हजार ७८८ जनावरे दाखल होती. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ८३९१, जालन्यातील १६,७८२, परभणीतील ४८५, उस्मानाबादमधील ६६,७३२ तर बीड जिल्ह्यातील छावण्यांमधील ३ लाख ४८ हजार ३९८ जनावरांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लांबलेल्या पावसामुळे चारा उत्पादनही लांबणीवर पडणार आहे. 

तालुकानिहाय छावण्या व जनावरांची संख्या

औरंगाबाद जिल्हा

तालुका छावण्या जनावरांची संख्या
औरंगाबाद   २  २५२२
फुलंब्री  १  ५७०
पैठण १७५१
वैजापूर १९१८
सिल्लोड ८३७
सोयगाव   १  २९४
गंगापूर २   ४९९

जालना जिल्हा

तालुका छावण्या    जनावरांची संख्या
जालना ३८०३
बदनापूर २  ७१८
भोकरदन ८  ४३५६
परतूर ३  १०२३
मंठा ५५३
अंबड ४२०१
घनसावंगी  २१२८
बीड जिल्हा
तालुका छावण्या जनावरांची संख्या
बीड  १६८  ९९,८५५
आष्टी १८२ १,१४,३२२
शिरूर कासार ५१ ४०,२७३
पाटोदा ४६ ३०,४४८
केज   २४   १५,९०४
अंबाजोगाई  ६०४
वडवणी ११ ७०५०
गेवराई ५० ३६,४२०
धारूर १७८५
परळी ३०४
माजलगाव १४३३
परभणी जिल्हा
तालुका  छावण्या  जनावरांची संख्या
परभणी   ४८५
उस्मानाबाद जिल्हा
तालुका छावण्या जनावरांची संख्या
उस्मानाबाद   ५   ४९२६
तुळजापूर  १  ४३०
भूम ४८  ३७,८२६
परंडा १८ १३,७६८
कळंब  ४८२४
वाशी  ६  ४९५८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com