अखेर कल्याणराव काळेंचा ‘राष्ट्रवादी’तील प्रवेश निश्‍चित 

भाजप नेते आणि सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे गुरुवारी (ता. ८) उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
Finally, Kalyanrao Kale's entry into the NCP is certain
Finally, Kalyanrao Kale's entry into the NCP is certain

सोलापूर ः भाजप नेते आणि सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे गुरुवारी (ता. ८) उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून कल्याणराव काळे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. विधानसभा निवडणुकीवेळी दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या कारखान्याच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यामुळे आता ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. 

पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करुन श्री. काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड केली आहे. या आधीही त्यांनी काँग्रेस, शिवसेना असा प्रवास केला आहे. आता भाजपमधून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असल्याने त्यांच्या सर्वच पक्षातील प्रवासामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांतही चलबिचल आहे. पण श्री. काळे मूळचे विठ्ठल परिवाराचे आहोत, विठ्ठल परिवारातील आपले महत्त्व आबाधित ठेवण्यासाठीच त्यांनी ही धडपड सुरू केल्याचे बोलले जाते. 

उपमुख्यमंत्री पवार आज पंढरपुरात  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारी (ता. ८) पंढरपुरात येत आहेत. पंढरपूर नजीकच्या श्रीयश पॅलेसमध्ये त्यांची सभा होणार आहे, या कार्यक्रमात श्री. काळे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com