महिला बचत गटाच्या माध्यमातून शेती, पूरक व्यवसायाला चालना

women day
women day

नांदेड ः जिल्ह्यातील महिला स्वंयसहाय्यता गटांच्या माध्यामातून पुदिना शेती, फुलशेती, भाजीपाला शेती तसेच शेळीपालन, दुग्ध व्यवसाय आदी पूरक व्यवसायाला चालना मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना उपजीविकेसाठी मोठा आधार मिळाला आहे. उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाल्यामुळे महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा समन्वयक चंदनसिंह राठोड यांनी दिली. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत नांदेड जिल्ह्यात तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सबलीकरण योजना, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, वॅाटर, ई शक्ती अभियान या योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यात आजवर ३ हजार ६०५ महिला स्वंयसहायता बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. महिला सदस्याची संख्या ३९ हजार २१० एवढी आहे.  महिला बचत गटांनी आजवर १९ कोटी ६ लाख रुपये एवढ्या रकमेची बचत विविध बॅंकामध्ये केली आहे. सर्व बचत गटांकडून अंतर्गंत कर्जाची देवाणघेवाण केली जात असून आजवर ११९ कोटी १५ लाख रुपयाचे अंतर्गत कर्जवाटप करण्यात आले. या कर्जाच्या परतफेडीचे प्रमाण ९६ टक्के आहे. विविध व्यवसाय, उद्योग करण्यासाठी बॅंकाकडून एकूण ८३ कोटी ४० लाख रुपये एवढे कर्ज वितरित करण्यात आले असून बॅकांच्या कर्जाची परतफेड करण्याचे प्रमाण ९९ टक्के आहे. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समता उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या १५ सदस्य सरपंच तर ६९ महिला ग्रामपंचायत सदस्य आहेत. ३५ कायदा साथी, २५ महिला हक्क दर्शक साथी, तंटामुक्त समित्यामध्ये ३७ महिला सहभागी आहेत. जिल्ह्यातील २० गावांमध्ये घर दोघांचे अभियान राबविले जात आहे. १५३ गावांमध्ये मुलींच्या जन्माचे स्वागत हा कार्यक्रम राबविण्यात आला. लक्ष्मीमुक्ती अभियानांतर्गत १५० महिलांची नावे ७-१२ उताऱ्यावर लावण्यात आली.

गटांकडून शेतीतही प्रयोग मेदनकल्लूर (ता. देगलूर) येथील प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर पुदिनाचे उत्पादन घेत आहेत. नाळेश्वर येथील महिला बचत गटांच्या १५ सदस्यांनी १५ एकरवर फुलशेती सुरू केली आहे. नांदेड येथील मार्केटमध्ये फुलांची विक्री केली जाते. जिल्ह्यातील वेगवेळ्या ठिकाणी १०३ महिलांनी १२५ एकरवर भाजीपाला लागवड केली आहे. मुजळगा येथील एक महिला १ एकर क्षेत्रावर आल्याचे उत्पादन घेत आहे.  पूरक व्यवसायातही पुढाकार  शेतीपूरक व्यवसायामध्ये ५७५ महिलांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. ३ महिला बचत गटांनी हंगामनिहाय कृषी निविष्ठा विक्री केंद्र सुरू केले आहे. २९ गावांमध्ये ढेप विक्री केंद्र सुरू करण्यात आले. सरसम येथील एका महिला गटाचे देशी गायीच्या दुधापासून खवानिर्मितीचे केंद्र आहे. धर्माबाद येथे एका गटाचे मसालानिर्मिती उद्योग आहे तर नाळेश्वर येथील एक गटाने मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आहे. भुसार माल खरेदी विक्री करणाऱ्या महिला बचत गटांची संख्या १५ आहे असे राठोड यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com