जालना जिल्ह्यात दहा मंडळांतील शेतकरी विमा भरपाईतून वगळले

जालना : जिल्ह्यातील दहा महसूल मंडळांना सीताफळाच्या ‘पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा मृग बहर २०२१’च्या विमा परताव्यातून कंपनीने वगळले आहे.
Farmers in ten circles in Jalna district were excluded from insurance coverage
Farmers in ten circles in Jalna district were excluded from insurance coverage
Published on
Updated on

जालना : जिल्ह्यातील दहा महसूल मंडळांना सीताफळाच्या ‘पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा मृग बहर २०२१’च्या विमा परताव्यातून कंपनीने वगळले आहे. तर २८ महसूल मंडळांत सीताफळाचा फळपीक विमा मंजूर करण्यात आला. मात्र तोही मापात पाप करून तोकडाच देण्यात आल्याचा आरोप सीताफळ उत्पादक करीत आहेत.

अधिक माहितीनुसार, ॲग्रोव्हिजन गटशेती संघ व सीताफळ महासंघाच्या प्रयत्नातून बऱ्याच वर्षांनंतर शासनाने या वर्षी प्रथमच सीताफळाला फळपीक विम्याचे कवच दिले. त्यामुळे जिल्ह्यातील ३८ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना सीताफळाचा विमा उतरविण्याची संधी मिळाली. १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या दोन महिन्यांच्या काळात पावसाचा खंड, तर १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या काळात जास्त पाऊस, असे धोक्याची प्रमाणके निर्धारित केली होती. त्यासाठी हेक्टरी ५५००० रुपये विमा रक्कम एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे संरक्षित केली होती. 

जालना जिल्ह्यात सीताफळाचा संपूर्ण हंगाम हातचा गेला. त्यातही कंपनीने परतावा देताना मापात पाप केले. शिवाय जिल्ह्यातील १० मंडळे वगळून सीताफळ उत्पादकांवर मोठा अन्याय केला. कंपनीने हेक्टरी ५५ हजार रुपये संरक्षित रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. - संजय मोरे-पाटील, प्रमुख ॲग्रोव्हिजन गटशेती संघ, नळविहिरा, जि. जालना.

विमा परतावा मंजूर मंडळे व रक्कम

  •   अंतरवाली टेंभी, भोकरदन, धावडा, घनसावंगी, गोंदी, हसनाबाद, जामखेड, केदारखेडा, कुंभारझरी, मंठा, पिंपळगाव रेणुका, रांजणी, रोहिलागड, सातोना, शेलगाव व वडीगोद्री या सतरा महसूल मंडळांत हेक्टरी ८८०० रुपये 
  •   बदनापूर, रोषनगाव व वाटूर या तीन महसूल मंडळांत हेक्‍टरी ९९०० रुपये.
  •   धनगर पिंपरी, पाचनवडगाव, रामनगर, तळणी व वाघ्रुळ जहागीर या पाच महसूल मंडळांत हेक्टरी १७६०० रुपये
  •   आष्टी, परतूर व श्रीष्टी या तीन महसूल मंडळांत हेक्टरी १८७०० रुपये.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com