शेतकऱ्यांना मुबलक बियाणे, खतांसाठी नियोजन करा ः पालकमंत्री शिंगणे 

बुलडाणा : खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक बियाणे, खतांचा पुरवठा व्हावा. त्यात कुठलीही कमतरता पडू नये, यासाठी नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते.
Farmers plan for abundant seeds, fertilizers: Guardian Minister Shingane
Farmers plan for abundant seeds, fertilizers: Guardian Minister Shingane
Published on
Updated on

बुलडाणा : खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक बियाणे, खतांचा पुरवठा व्हावा. त्यात कुठलीही कमतरता पडू नये, यासाठी नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. 

या प्रसंगी व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमूलकर, राजेश एकडे, संजय गायकवाड, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन आदी उपस्थित होते. सभागृहात आमदार श्वेताताई महाले, आमदार ॲड. आकाश फुंडकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक आदींची उपस्थिती होती. 

खरीप हंगामामध्ये कृषी विभागामार्फत कृषी निविष्ठा गावात पोहचविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना करीत डॉ. शिंगणे म्हणाले की, सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमतेची चाचणी घेण्यात यावी. त्यासाठी गावनिहाय कार्यक्रम आखावा. त्या पद्धतीने कार्यवाही करावी. तसेच शेतकरी उपयोगात आणत असलेले बीटी बियाण्यांचा अभ्यास करून शेतकऱ्यांना लागणारे बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे. सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीमाल विक्रीची व्यवस्था बळकट करावी. यासाठी कृषी विभागाने मोहीम राबवावी. गुणनियंत्रणासंदर्भात विभागाने जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथकांची स्थापना करावी. या पथकांकडून खते, बियाणे व कीटकनाशक दुकानांची तपासणी करावी. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १५ जूनपर्यंत कृषी पतपुरवठा पूर्ण करण्यात यावा, असेही निर्देश दिले. 

खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना सिंचनाकरिता रात्रीसुद्धा वीज उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली. बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. नाईक यांनी माहिती देताना खरिपात जिल्ह्यात सोयाबीन ३ लाख हेक्टर, कापूस २ लाख २१ हजार हेक्टर, तूर ७८ हजार हेक्टर, उडीद २१ हजार ४०० हेक्टर, मका २६ हजार, ज्वारी ८९०० हेक्टर व इतर पिके १९५० हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन असल्याचे सांगितले. 

खरिपात एकूण ७ लाख ३७ हजार ८५० हेक्टर लागवडीचे नियोजन आहे. जिल्ह्यासाठी १ लाख ७५ हजार ६८० टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. त्यापैकी ३५ हजार २९४ टन खताचा पुरवठा झाला आहे. 

असे लागेल बियाणे  सोयाबीन- ८० हजार क्विंटल  बीटी कपाशी- १२ लाख १४ हजार पाकिटे  तूर- ५५०० क्विंटल  मूग- २००० क्विंटल 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com