नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांची यंदाही सोयाबीनला सर्वाधिक पसंती

नांदेड : ‘‘जिल्ह्यात यंदाच्या (२०२०-२१) खरीप हंगामात बुधवार (ता.१७) पर्यंत १ लाख १३ हजार ७५९ हेक्टरवर (१५.३१ टक्के) पेरणी झाली आहे.
Farmers in Nanded district still prefer soybean
Farmers in Nanded district still prefer soybean

नांदेड : ‘‘जिल्ह्यात यंदाच्या (२०२०-२१) खरीप हंगामात बुधवार (ता.१७) पर्यंत १ लाख १३ हजार ७५९ हेक्टरवर (१५.३१ टक्के) पेरणी झाली आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे दिसत आहे. सोयाबीनची ६४ हजार २४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्याखालोखाल कपाशीची ३३ हजार ६४७ हेक्टरवर लागवड झाली आहे’’, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ७ लाख ४२ हजार ८३१ हेक्टर आहे. बुधवार (ता.१७) पर्यंत जिल्ह्यात एकूण १ लाख १३ हजार ७५९ हेक्टरवर (१५.३१ टक्के) पेरणी झाली. यंदाही शेतकऱ्यांनी सोयाबीनला अधिक पसंती दिल्याचे चित्र आहे.

सोयाबीन ६४ हजार २४० हेक्टर (२०.७६ टक्के), कपाशी ३३ हजार ६४७ हेक्टर (१२.९२ टक्के), तूर ६ हजार ८२० हेक्टर (११.२२ टक्के), मूग २ हजार ५५२ हेक्टर (९.४९ टक्के), उडीद २ हजार १३ हेक्टर (७.०४ टक्के),ज्वारी ४ हजार २९५ हेक्टर (८.०७ टक्के), तीळ ४६ हेक्टर (५.७६ टक्के), कारळ २९ हेक्टर (६.१६ टक्के) आदी पिकांचा समावेश आहे.

तृणधान्यांची ४ हजार ३३२ हेक्टरवर (७.८७ टक्के), कडधान्यांची ११ हजार ४६५ हेक्टरवर (९.८५ टक्के), गळित धान्यांची ६४ हजार २४० हेक्टरवर (२०.६९ टक्के) पेरणी झाली आहे. मुखेड तालुक्यात सर्वाधिक ५९.८९ टक्के क्षेत्रावर, तर माहूर तालुक्यात सर्वात कमी २.७३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणी योग्य पावासाअभावी अनेक तालुक्यात अद्याप पेरणी दोन टक्क्यांच्या आतच आहे, असे सूत्रांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com