Extensive tree felling in Shevgaon taluka
Extensive tree felling in Shevgaon taluka

शेवगाव तालुक्यात सर्रासपणे वृक्षतोड

शेवगाव ः शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. अत्याधुनिक कटर मशिन व वाहनांच्या मदतीने रात्रंदिवस सुरू असलेल्या या वृक्षतोडीकडे वनविभागाने काणाडोळा केला. त्यामुळे तालुक्याची वाटचाल उजाड होण्याकडे सुरू झाली आहे.
Published on

शेवगाव ः शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. अत्याधुनिक कटर मशिन व वाहनांच्या मदतीने रात्रंदिवस सुरू असलेल्या या वृक्षतोडीकडे वनविभागाने काणाडोळा केला. त्यामुळे तालुक्याची वाटचाल उजाड होण्याकडे सुरू झाली आहे. या व्यवसायातील भरमसाट कमाईमुळे बेकायदेशीररीत्या चालवल्या जाणाऱ्या वखारी व गावोगावी तयार झालेल्या लाकूडतोड्यांच्या टोळ्या हळूहळू वाढत आहेत. 

शेवगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेने, शेताच्या बांधावरील वृक्षतोड रात्रंदिवस सुरू आहे. मोठ्या वाहनांमध्ये कटर मशिन टाकून जनरेटरच्या साह्याने ते चालवले जाते. त्यामुळे आकाराने मोठे वृक्षदेखील काही वेळातच तोडले जातात. त्यापासून मिळणारी विविध आकारांचे लाकडे त्याच वाहनात भरून शहरात आणली जातात. शहरातील अधिकृत अनधिकृत गिरण्यांबाबत वनविभाग हेतूपरस्पर डोळेझाक करत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील  जुनी, मोठ्या आकाराचे देशी जातीचे वृक्ष दररोज तोडले जात आहेत. यामध्ये कडुनिंब, पिंपळ, बाभूळ, चिंच, जांभुळ या महत्त्वाच्या देशी वृक्षाचा समावेश आहे. 

तालुक्यातील लोळेगाव, वडुले, बोधेगाव, मुंगी, बालमटाकळी, मुंगी, लाडजळगाव, चापडगावसह तालुक्यात प्रचंड नफ्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्या कामगारांच्या टोळ्या वाढत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टी, महापूर व रोगराईमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. त्यामुळे शेतीमध्ये खर्च करण्यासाठी शेतकऱ्यांचे लक्ष बांधावरील झाडाकडे वळले आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा फायदा हे व्यावसायिक घेत आहेत. 

शेवगाव तालुक्यातील वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणाऱ्या व्यक्तीं व संस्थांची संख्या अत्यल्प आहे. त्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. वृक्ष लागवडी बरोबरच वृक्षांचे जतन करणे, वृक्षतोड थांबवणे काळाची गरज आहे. - दीपक तागड, शेवगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com