कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी वाशीम जिल्ह्यात मिळणार अनुदान

वाशीम: कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन गावांमध्ये कृषी अवजार बँकेद्वारे भाडे तत्त्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधा उपलब्ध होणार आहे.
 For the establishment of agricultural implements bank Grants will be given in Washim district
For the establishment of agricultural implements bank Grants will be given in Washim district

वाशीम : कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन गावांमध्ये कृषी अवजार बँकेद्वारे भाडे तत्त्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधा उपलब्ध होणार आहे. कृषी अवजारे बँकेसाठी ८० टक्के किंवा जास्तीत जास्त ८ लाख अनुदान दिले जाणार आहे. 

आकांक्षित असलेल्या वाशीम जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाअंतर्गत कृषी कल्याण अभियान ३ अंतर्गत कृषी अवजारे बँक स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक व पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकऱ्यांचे स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक गट तसेच कृषी विज्ञान केंद्रांनी १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.

राज्यातील चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाद्वारे यापूर्वी कृषी कल्याण अभियान भाग-१ व भाग-२ मध्ये निवडलेल्या गावांमध्येच कृषी अवजारे बँक सुविधेचा लाभ देय राहणार आहे. या निवडक गावांतून ट्रॅक्टरची संख्या कमी प्रमाणात असलेली गावे, अल्प व अत्यल्प जमीनधारकांचे प्रमाण अधिक असलेली गावे व सध्या कृषी उत्पादकता वाढीस वाव असलेली गावे या योजनेसाठी पात्र असतील.

अर्जासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, खरेदी करावयाचे यंत्र, अवजारे संचाचे दरपत्रक व परीक्षण पुरावा, आधारकार्ड संलग्न बँक खात्याच्या पासबुकाच्या पहिल्या पृष्ठांची छायांकित प्रत, संस्थेशी संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधिकृत केले असल्यास प्राधिकृत केल्याचे पत्र व संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड, फोटो असलेल्या ओळखपत्राची स्वयंसाक्षांकित परत सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जांमधून सोडत पद्धतीने उपविभागीय कृषी अधिकारी निवड करतील. तरी, इच्छुकांनी १५ नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करावा, असही तोटावार यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com