हंगाम समाप्तीच्या तारखांनी ऊसतोडणीचे टेन्शन कायम

नगर : जिल्ह्यात ३ मार्चपर्यंत साधारणपणे १ लाख ४० हजार हेक्टरवर क्षेत्रावरील ऊसतोड झाली आहे, तर ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा आहे.
By the end of the season sugercane cutting Tension
By the end of the season sugercane cutting Tension

नगर : जिल्ह्यात ३ मार्चपर्यंत साधारणपणे १ लाख ४० हजार हेक्टरवर क्षेत्रावरील ऊसतोड झाली आहे, तर ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा आहे. साखर कारखान्यांनी कारखाने बंद करण्याचा तारखा दिलेल्या असल्या तरी उभा ऊस तोडणी झाल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत असे सांगितले जात आहे. मात्र गेल्या वेळेच्या तुलनेत यंदा ऊस तोडण्याचे टेन्शन शेतकऱ्यांसमोर आहे.

नगर जिल्ह्यात यंदा १४ सहकारी व ९ खासगी असे २३ साखर कारखान्याकडून उसाचे गाळप केले जात आहे. या वर्षी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील यंदा सुमारे १ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. त्यातून एक सुमारे एक कोटी साठ लाख टनाच्या जवळपास उसाची उपलब्धता आहे.

जिल्ह्यात साधारणपणे हेक्टरी ८५ टन ऊस उत्पादकता गृहीत धरून आकडेवारी सांगितली जात आहे. त्यानुसार यंदा जिल्ह्यात १ कोटी ६० लाख टनाच्या जवळपास गाळप होईल. आतापर्यंत १ कोटी २० लाखाच्या जवळ उसाचे गाऴप झाले आहे. अजून साधारण ४० लाख टन ऊस शिल्लक आहे. 

जिल्ह्यातील साखर कारखान्यांची उसाची गाळप क्षमता १ लाख टन असून, ८५ ते ९० हजार टनापर्यंत गाळप होत आहे. 

जास्तीच्या पावसामुळे उसाचे नुकसान झाले आहे. अनेक भागांत उसाला तुरे आले आहे. तुरे आले तर वजनात घट होते. केवळ साखर कारखान्याकडून तोड न झालेल्या उसाची पाहणी करून शेतकऱ्यांना घटत्या ऊस वजनाची भरपाई मिळाली पाहिजे. - संभाजी दहातोंडे, अध्यक्ष, शेतकरी मराठा महासंघ

माझा पाच-सहा एकर खोडवा ऊस आहे. पावसाळ्यात शेतात पाणी साठवून राहिल्याने उसाला वयापेक्षा आधीच तुरे आले. कारखान्यांकडून नोंदीप्रमाणे ऊसतोडणी होत आहे. खरं तर तुरे आलेल्या उसाची लवकर तोडणी व्हायला हवी, मात्र सगळ्यात शेतकऱ्यांच्या उसाला तुरे आल्याने लवकर तोडणी तरी कोणाची करणार, यंदा मात्र वजन घटल्याने मोठा आर्थिक फटका बसणार आहे. - कैलास पटारे पाटील, शेतकरी, कारेगाव, ता. श्रीरामपूर, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com