‘ईडी’ ही भाजपची एटीएम मशिन : राऊत

मुंबई : ‘‘ईडीचे अधिकारी चौकशीच्या नावाखाली बिल्डर आणि कार्पोरेट कंपन्यांकडून खंडणी वसूल करत आहेत. हे अधिकारी भाजपचे एटीएम मशिन ठरत आहेत’’, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
 'ED' is BJP's ATM machine: Raut
'ED' is BJP's ATM machine: Raut

मुंबई : ‘‘ईडीचे अधिकारी चौकशीच्या नावाखाली बिल्डर आणि कार्पोरेट कंपन्यांकडून खंडणी वसूल करत आहेत. हे अधिकारी भाजपचे एटीएम मशिन ठरत आहेत’’, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. 

शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ईडीचे विभागीय अधिकारी एजंटाकरवी करत असलेल्या खंडणी वसुलीचे पुरावे सादर केले. एका एजंटाकरवी कोट्यवधी रुपयांची रक्कम वसूल केल्याचे आरोप करत त्यांनी बँक खात्याचे विवरण सादर केले. या वेळी खासदार विनायक राऊत उपस्थित होते. 

खंडणीप्रकरणी ईडीचे चार अधिकारी आणि वसुली एजंट जितेंद्र नवलानी यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचेही राऊत यांनी सांगितले. 

राऊत म्हणाले, ‘‘मुंबईत धाडीवर धाडी पडत आहेत. मग आम्ही विचार केला की आम्हीही एक छापा टाकू. आमच्या घरात कुणी घुसत असेल, तर शिवसेनेलाही घुसण्याचा अधिकार आहे. मंगळवारी सकाळपासून आमच्या काही कार्यकर्त्यांवर आयकर विभागाची रेड पडली आहे. बीएमसी निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत प्रत्येक वॉर्डात छापे पडतील. केवळ महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लोकांवर धाडी टाकल्या जात आहेत. देशात अन्य कुठेही नेते नाहीत, की जेथे चौकशी करू शकेल. केवळ तृणमूल आणि शिवसेनेला का लक्ष्य केले जाते, हे अद्याप कळत नाही.’’ 

सुमीत नरवर हा सामान्य माणूस चार वर्षात आठ हजार कोटींचा मालक झाला. सध्या तो मलबार हिलला राहतो. आता ईडीने कोणता चष्मा लावला आहे? असले लोक दिसत नाहीत का? दिल्ली आणि महाराष्ट्रातील भाजपच्या कुठल्या नेत्याची बेनामी प्रॉपर्टी त्यांच्याजवळ आहे, हे मी पंतप्रधानांना देणार मग ईडीला देणार आहे’’, असेही राऊत म्हणाले. 

राऊत म्हणाले, ‘‘जितेंद्र चंद्रलाल नवलानी याने बिल्डरांकडून वसुली केली आहे. चेक, कॅश आणि डिजिटल ट्रान्स्फर आहे. ज्या कंपन्यांची चौकशी केली आहे, त्यांनी जितेंद्र नवलानी याच्या खात्यावर ट्रान्स्फर केली. हा ईडीच्या बड्या अधिकाऱ्यांसाठी वसुली करतो. याच्या कंपनीत कुणीही कर्मचारी नाही. तरीही हा कन्सल्टिंग करतो. वाधनवानच्या कंपनीची चौकशी झाली. त्यांनी १५ कोटी, अविनाश भोसले यांची चौकशी सुरू झाली, त्यांनी १० कोटी रुपये जमा केले. चौकशीअंती भाजपचे कुठले नेते यात सहभागी झाले आहेत, हे समोर येईल.’’  ‘किरीट सोमय्या ब्लॅकमेलर’ 

‘‘पाचवा एजंट किरीट सोमय्या आहे. ईडीचे मोठे अधिकारी यात आहेत. काहीजण तर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत. ईडीचे अधिकारी खंडणी वसुलीचे काम करत आहेत. त्यांचे कारनामे पंतप्रधान कार्यालयाला पाठविले आहेत. सोमय्या यांनी जुलै २०१५ मध्ये जीव्हीके कंपनीने मुंबई विमानतळाची ६३ एकर जमीन हडप केली. दरम्यान सोमय्या यांचा मुलगा नील याला निकॉन इंफ्राला पार्टनर करून घेतल्यानंतर या तक्रारी बंद झाल्या. राकेश वाधवान यांच्याशी त्यांनी पार्टनरशिप केली. राकेश वाधवान यांना पीएमसी बँक घोटाळ्यात ब्लॅकमेल करून ही पार्टनरशिप घेतली,’’ असा आरोप राऊत यांनी केला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com