पुणे जिल्ह्यात गारपिटीमुळे  आंब्याचे मोठे नुकसान

जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याचे मोठे नुकसान होऊन, हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यातील पश्‍चिम भागात मोठ्या प्रमाणावर हापूस, केशरसह स्थानिक वाणांची लागवड आहे.
पुणे जिल्ह्यात गारपिटीमुळे  आंब्याचे मोठे नुकसान Due to hail in Pune district Great loss of mango
पुणे जिल्ह्यात गारपिटीमुळे  आंब्याचे मोठे नुकसान Due to hail in Pune district Great loss of mango
Published on
Updated on

पुणे ः जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याचे मोठे नुकसान होऊन, हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यातील पश्‍चिम भागात मोठ्या प्रमाणावर हापूस, केशरसह स्थानिक वाणांची लागवड आहे. सध्याचा काळ कैरीधारणेचा असून, सततच्या वादळी पावसाने कैरी गळण्याचे आणि गारांच्या माऱ्यांना पडल्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात जुन्नर, खेड, आंबेगाव, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी या पश्‍चिम भागात आंब्याची पारंपरिक तसेच नव्याने लागवडी झाल्या आहेत. कोकणातील आंब्याचा हंगाम संपला, की पुण्यासह मुंबई बाजार समितीमध्ये या भागातील आंब्याचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे कोकणाप्रमाणेच या भागातील आंब्याला विशेष मागणी आणि दर असतो.

मात्र सध्या जिल्‍ह्यात होणाऱ्या सततच्या वादळी पाऊस आणि गारपिटीने आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे गावरान हापूसचा हंगाम कमी कालवधी राहण्याचा अंदाज पुणे बाजार समितीमधील गावरान हापूसचे अडते तात्या कोंडे यांनी सांगितले. तर मुंबई बाजार समितीमध्ये देखील जुन्नर हापूसची आवक कमी राहून दर चढे राहण्याचा अंदाज प्रमुख अडतदार संजय पानसरे यांनी व्यक्त केला आहे.

आणखी पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार नगर : नगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश काही ठिकाणी अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. कर्जत, नगर, पारनेर, श्रीगोंदे या ठिकाणी हलका पाऊस पडण्याचीही शक्‍यता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी विद्या विभागाअंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेद्वारे कळविण्यात आले आहे. 

पावसाची शक्‍यता असल्याने, कापणी केलेली पिके शेडमध्ये किंवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत. पिकांची काढणी शक्‍यतो सकाळच्या वेळेतच करावी. जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. जनावरांना उघड्यावर चरायला सोडू नये, तसेच झाडाखाली बांधू नये. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानाच्या पूर्वानुमानाकरिता ‘मेघदूत मोबाईल ॲप’चा वापर करावा, असे विद्यापीठाने सूचित केले आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि काही ठिकाणी अधून-मधून पूर्वमोसमी पाऊस पडत असल्याने शेतकरी मात्र धास्तीत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com