परभणीत गारपिटीमुळे पिके झाली भुईसपाट

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये रविवारी (ता.२१) सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला पावसात गारपीट झाली. शेतातील उभी ज्वारी, गहू पिके आडवी झाली.
परभणीत गारपिटीमुळे पिके झाली भुईसपाट Due to hail in Parbhani The crops were flattened
परभणीत गारपिटीमुळे पिके झाली भुईसपाट Due to hail in Parbhani The crops were flattened
Published on
Updated on

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये रविवारी (ता.२१) सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला पावसात गारपीट झाली. शेतातील उभी ज्वारी, गहू पिके आडवी झाली. आंबा, संत्रा पिकांची फळगळ झाली. काढणी केलेली हळद, ज्वारीचा खुडलेली कणसे, हरभरा, गहू भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेत रविवारी (ता.२१) सकाळी ११.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या दोन जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून दररोज सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे.

काही भागात गारपीट देखील झाली. शनिवारी (ता.२०) सायंकाळी परभणी, जिंतूर, सेलू, मानवत तालुक्यातील अनेक मंडळात जोरदार वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. परभणी तसेच तालुक्यातील जांब मंडळातील मांडाखळी परिसरात अनेक गावशिवारात रात्री काही वेळ जोरदार पावसात गारपीट झाली. त्यामुळे टरबूज, संत्रा फळपीकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव तालुक्यातील अनेक गावात हलका ते मध्यम पाऊस झाला.त्यामुळे हळद, हरभरा, गहू पिके भिजून नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com