टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीस आणावा : अभ्यासकांचा सल्ला, लाल कांद्याला द्या प्राधान्य

टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीस आणावा : अभ्यासकांचा सल्ला, लाल कांद्याला द्या प्राधान्य
टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीस आणावा : अभ्यासकांचा सल्ला, लाल कांद्याला द्या प्राधान्य

नाशिक  : कोरोनाची भीती व हवामान बदलामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या वाढलेल्या आवकेमुळे बाजार दरावर प्रतिकूल परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीचे नियोजन केल्यास दरातील घसरण रोखणे आणि सुधारणा शक्य आहे, यासाठी प्राधान्याने आवश्‍यकतेनुसार आधी लाल कांदा व नंतरच्या टप्प्या-टप्प्याने उन्हाळ कांदा विक्रीस आणावा असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. अभ्यासकांनुसार कांदा निर्यात सुरळीत झाल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल बाहेर पाठवला आहे. मात्र कोरोनामुळे निर्यातीची गती मंदावली आहे. परंतु साठवणूक मर्यादा नसल्याने व्यापारी अधिक माल घेऊ शकत असल्याने गरजेनुसार माल ते घेऊन ठेवत आहेत. दुसरीकडे जागतिक कांदा निर्यातीत भारताचा मुख्य स्पर्धक चीन असून निर्यातीसाठी अनेक कंटेनर येथे अडकून पडलेले आहेत, त्यामुळे व्यापाऱ्यांना निर्यात प्रक्रियेत कंटेनरही उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. त्यात लाल कांद्यानंतर उन्हाळ कांदा बाजारात येत असल्याने अचानक आवकेत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत लासलगाव, पिंपळगाव बसवंत व उमराने बाजारात दुपारच्या सत्रात वाढ होत असल्याने दरात फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन आणि गरजेनुसारच माल विक्री करावा असे कांदा अभ्यासकांनी सुचविले आहे.  प्रतिक्रिया... निर्यातबंदी उठल्यावर शेतकऱ्यांनी एकदम माल विक्रीला सुरुवात केल्याने मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे ,त्यामुळे दरात घसरण होत आहे. लाल व उन्हाळ कांद्याची आवक होत असल्याने लाल कांदा विक्रीला प्राधान्य द्यावे व तो टप्प्याटप्प्याने विक्री करावा. उन्हाळ कांद्याला नंतर विकले तर बाजार टिकून राहण्यासाठी मदत होणार आहे.  — नानासाहेब पाटील,  संचालक, नाफेड, नवी दिल्ली टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात विक्रीस आणायला हवा. कांदा उत्पादकांनी टप्प्याने विक्रीचा निर्णय घेतल्यास, दर टिकून राहून सर्वांना दोन पैसे मिळण्यास मदत होईल. — साहेबराव मोरे,  जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com