जनावरात ‘काँगो फिवर’चा धोका

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असताना आता ‘क्रायमिन काँगो हेमोरेजिक फीव्हर’ या आजाराचा धोका निर्माण होऊलागला आहे.
Danger of Congo fever in animals
Danger of Congo fever in animals
Published on
Updated on

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असताना आता ‘क्रायमिन काँगो हेमोरेजिक फीव्हर’ या आजाराचा धोका निर्माण होऊ लागला आहे. बाधित जनावरांच्या संपर्कात आल्यास किंवा त्याचे मांस खाल्ल्यास हा आजार मानवाला होतो, असा निष्कर्ष काढत पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाने यासंबंधी धोक्याची सूचना दिली आहे.

ठाणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. गुजरातमधील सीमावर्ती भागात काँगो तापाची लक्षणे दिसल्याने पालघरपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातही यंत्रणांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून गोचिड निर्मूलन कार्यक्रम हाती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार जनावरे आणि गोठ्यामध्ये गोटिडनाशकाची फवारणी करण्यात येत आहे. तसेच गुजरात राज्यातून जनावरांची वाहतूक होणार नाही, याकडे लक्ष ठेवले जात आहे. गुजरातमधील कच्छ आणि बोताड जिल्ह्यांमध्ये काँगो फीव्हर या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. जनावरांवरील गोचीड, पिसवा यामुळे हा आजार होतो, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. 

एखाद्या बाधित जनावरांच्या रक्ताशी संपर्क झाल्यास किंवा बाधित जनावराचे मांस खाल्ल्यास हा आजार बळावत असल्याचे समोर आले आहे. गुजरातमधून शेळी, मेंढी यांची मोठ्या प्रमाणात पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये वाहतूक होत असते. त्यामुळे पालघरमध्ये इशारा देण्यात आला आहे. गुजरातमधून येणाऱ्या या जनावरांची पालघरच्या तपासणी नाक्यांवर चाचणी केली जात आहे. ठाणे जिल्हा हा पालघर जिल्ह्याला लागून आहे. तसेच गुजरातहून आलेल्या जनावरांची पालघर मार्गे ठाण्यात वाहतूक केली जाते.

तपासणी इशाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्याला सध्या तरी या रोगाचा धोका नाही, असे आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले. तरीही जिल्ह्यातही पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू आहेत.  २०१२ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात सुमारे ७ लाख २६ हजार पशुधन आहे. त्यामुळे वाहतूक रोखण्यासोबतच गाई, बैल, मेंढी, बकरे यांच्यासह इतर पाळीव जनावरे आणि भटक्या प्राण्यांवर गोचीड निर्मूलनासाठी फवारणी केली जाणार आहे, तर तालुका पातळीवरही या संदर्भात बैठकांचे आयोजन केले जात आहे. 

‘काँगो ताप’ काय आहे?

एखाद्या बाधित जनावराच्या संपर्कात आल्यास मानवाला हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच हा आजार बळावल्यास मृत्यूचे प्रमाण ३० टक्के आहे. या आजारावर अद्याप उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून नियंत्रण मिळवणे  आवश्यक आहे.

      आजाराची लक्षणे

  • बाधित व्यक्तींमध्ये सुरुवातीला डोके दुखणे, जास्त ताप येणे, सांधेदुखी, पोटदुखी, उलटीचा त्रास.
  • डोळे लाल होणे, घशात तसेच जबड्याच्या वरच्या भागात फोडी येणे
  • आजार बळावल्यास रक्तस्राव, नाकातून रक्त
  • मृत्यूचे प्रमाण ३० टक्के
  •     प्रतिबंधात्मक उपाय

  • शेतकरी, पशुपालक, पशुवैद्यकांनी गोठ्याची स्वच्छता राखावी, मुखपट्टी, हातमोजे, पायांना पूर्ण झाकणाऱ्या बुटांचा वापर.
  • रोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी जागृतीवर भर, गोचिड निर्मूलन कार्यक्रम कीटकनाशक फवारणी.
  • गोचिड हाताने काढणे वा मारणे कटाक्षाने टाळावे
  • ठाणे जिल्ह्याला ‘काँगो फीव्हर’ आजाराचा अद्याप धोका नाही. मात्र, जिल्ह्यात आम्ही सर्व ठिकाणी गोचीड निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला आहे. तसेच पशुपालन करणाऱ्यांनाही या आजाराची माहिती देत आहोत. – डॉ. व्ही. व्ही. धुमाळ, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, ठाणे जिल्हा

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com