प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोर्ट परिसरातील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला.
Crime filed against Praveen Darekar
Crime filed against Praveen Darekar

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोर्ट परिसरातील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला.

दरम्यान, याचे पडसाद विधानसभेतही उमटले. राज्यात असे किती आमदार आहेत, की ते मजूर संस्थेचे पदाधिकारी आहेत, याची यादी सादर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सरकार विरोधकांचा आवाज दाबत आहे. अशा पद्धतीने आवाज दाबू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही वर्गांतून निवडून आले होते. मात्र निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच दरेकर यांना मजूर वर्गासाठी अपात्र घोषित केले होते. त्यानंतर दरेकर यांनी मजूर प्रवर्गातील संचालकपदाचा राजीनामा दिला होता. तरीही सहकार विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरूच ठेवली होती. दरेकर यांनी ज्या मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मुंबै बँकेची निवडणूक लढविली होती, त्या प्रतिज्ञापत्रात मजूर संस्थेत ते रंगारी असल्याचे दाखवण्यात आले होते. 

आपचे नेते धनंजय शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी मुंबई बँक, हजारो ठेवीदार आणि सहकार विभागाची २० वर्षे फसवणूक केल्याप्रकरणी दरेकर यांच्याविरोधात तक्रार दिली होती.  दरेकर हे १९९७ पासून मुंबई बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत.  मात्र ते मजूर नसतानाही निवडणूक कसे काय लढवतात? शिवाय आत्तापर्यंत त्यांनी मजूर असल्याचे दाखवून निवडणूक लढवून सर्वांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार दिली होती.

विधान परिषदेत सरकारविरोधात सातत्याने आवाज उठवल्याने सूड भावनेने गुन्ह्याची नोंद झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हा दाखल करण्याचे षड्‌यंत्र सुरू आहे. पण सरकारला काहीही हाती लागणार नाही. कुठल्याही परिस्थितीत गुन्हा दाखल करावाच, यासाठी अजित पवार यांच्यावर दबाव आणला गेला.  - प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेता, विधान परिषद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com