चक्रीवादळाचा राजापूर तालुक्याला जोरदार दणका

राजापूर तालुक्याच्या पूर्व परिसराला जोरदार चक्रीवादळाने दणका दिला. यामध्ये प्रामुख्याने रायपाटण, पाचलमध्ये जोरदार पडझड झाली आहे.
Chakrikavadacha Rajapur Talukyala Vigorous Danka
Chakrikavadacha Rajapur Talukyala Vigorous Danka
Published on
Updated on

राजापूर, जि. रत्नागिरी ः तालुक्याच्या पूर्व परिसराला जोरदार चक्रीवादळाने दणका दिला. यामध्ये प्रामुख्याने रायपाटण, पाचलमध्ये जोरदार पडझड झाली आहे. अनेकांच्या घरांवर झाडे उन्मळून पडली, कौले उडाली, पत्रे उडाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काल (ता.२३) झालेल्या वादळानंतर रात्रीपासून वीज गायब झाली होती.  होळीच्या मांडांना वादळाची झळ पोहचल्याने मांडावरील विराजमान देवतांच्या पालख्या आजूबाजूच्या घरांमध्ये बसवाव्या लागल्या.  रायपाटण येथील ३५ घरांचे ५० हजाराचे तर तळवडे येथील ७ घरांचे सुमारे ३० हजार रुपये नुकसान झाले आहे.  बुधवारी (ता.२३) सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी साडेपाचच्या वाऱ्याने वेग धारण केला आणि त्याचे जोरदार चक्रीवादळात रूपांतर झाले. वारा वेगाने वाहू लागला. पावसालाही सुरुवात झाली.  अचानक सुरू झालेल्या वादळाने जोरदार वेग घेत तडाखा दिला. रायपाटणमधील बागवाडी, खाडेवाडी, कदमवाडी, सनगरवाडी, बाजारवाडी आदी वाड्यांसह पाचलमधील काही वाड्या आणि परिसरात वादळाचा जोरदार फटका बसला. काही घरावर झाडे उन्मळून पडल्याने घरांचे अतोनात नुकसान झाले. घरातील माणसे भयाने बाहेर पळाली.  रायपाटण होळीचा मांडावरील उभारलेली होळी एका बाजूला थोडीशी कलंडली होती. नंतर ग्रामस्थांनी व्यवस्थित केली तर पाचलमधील होळीच्या मांडावरदेखील पडझड झाली.  रायपाटण ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात एक वृक्ष उन्मळून पडला तर गावातील बागवाडी, खाडेवाडी, कदमवाडीमध्ये विद्युत वाहिन्यांवर झाडे पडल्याने गावासह लगतच्या परिसरातील विद्युत पुरवठा दीर्घकाळ खंडित झाला होता. गुरुवारी दुपारपर्यंत तो सुरळीत झाला नव्हता. परिसरातील मोबाइल सेवाही खंडित झाली होती. रायपाटणमधील श्रीरेवणसिद्ध मठामध्येदेखील वादळात पडझड झाली. सध्या होळीचा सण सुरू असून, वादळी पावसामुळे ठिकठिकाणच्या होळीच्या मांडांना त्याची झळ पोहचल्याने मांडावरील विराजमान देवतांच्या पालख्या आजूबाजूच्या घरांमध्ये बसवाव्या लागल्या. 

पंचनाम्यानंतर नुकसानीचा अंदाज  वादळी पावसाचा जोरदार तडाखा आंबा-काजू पिकांना बसला. अनेक ठिकाणी आंबा-काजूच्या बागांना तडाखा बसला. कलमे वाकली, काही मोडून पडली, बागांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला असून, नक्की किती नुकसान झाले ते पंचनामा झाल्यानंतरच समजू शकणार आहे. गेल्या काही वर्षात वादळी पावसाचा असा फटका परिसराला बसला नव्हता.   

   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com