कीड, रोगनियंत्रणासाठी बायोमिक्स ठरतेय उपयुक्त

‘बायोमिक्स’ हे पीक संवर्धक प्रामुख्याने हळद तसेच विविध पिकांवरील कीड, रोगनियंत्रण तसेच रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी, शेतीमालाचा दर्जा, गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
कीड, रोगनियंत्रणासाठी बायोमिक्स ठरतेय उपयुक्त Biomix is useful for pest and disease control
कीड, रोगनियंत्रणासाठी बायोमिक्स ठरतेय उपयुक्त Biomix is useful for pest and disease control
Published on
Updated on

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वनस्पती विकृतिशास्त्र विभागातील संशोधन प्रकल्पांतर्गंत प्रायोगिक तत्त्वावर निर्मित विविध बुरशी आणि जिवाणूंचे मिश्रण असलेले ‘बायोमिक्स’ हे पीक संवर्धक प्रामुख्याने हळद तसेच विविध पिकांवरील कीड, रोगनियंत्रण तसेच रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी, शेतीमालाचा दर्जा, गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी होत आहे. गेल्या चार वर्षांत बायोमिक्सच्या विक्रीतून विद्यापीठास ६ कोटी ८९ लाख रुपये महसूल प्राप्त झाला आहे. दर वर्षी शेतकऱ्यांकडून मागणी वाढत असल्याने राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या प्रकल्पाचे बळकटीकरण केले जात आहेत. परभणी कृषी विद्यापीठातील वनस्पती विकृतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कल्याण आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली २००७ पासून पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विविध बुरशी, जिवाणूंपासून पिकांवरील कीड-रोगनियंत्रक घटकांची निर्मितीचा संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिवाणूंच्या ६ प्रजाती आणि बुरशीच्या ६ प्रजातींचे मिश्रण करून बायोमिक्स तयार करण्यात आले आहे. एकापेक्षा अधिक जिवाणू आणि बुरशी यांचे मिश्रण तयार विक्री करणारे परभणी कृषी विद्यापीठ पहिलेच विद्यापीठ आहे. सन २०१७ ते २०२० या चार वर्षांत ३७ हजार ९०० शेतकऱ्यांना ६ कोटी ८९ लाख रुपये किमतीच्या ४८० टन बायोमिक्सची विक्री करण्यात आली. गतवर्षी (२०२०-२१) आजवरची विक्रमी १६ हजार शेतकऱ्यांना १९५ टन बायोमिक्सची विक्री झाली. त्यातून २ कोटी ९३ लाख रुपयाचे उत्पन्न विद्यापीठास मिळाले. प्रयोगशाळेचे बळकटीकरण हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांत अनुभवातून शेतकरी ते शेतकरी, असा बायोमिक्सचा प्रचार होत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतूनही मागणी वाढत आहे. त्या अनुषंगाने प्रयोगशाळेचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी २०१९-२०मध्ये कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून प्रयोगशाळेची नवीन इमारत बांधकाम सुरू करण्यात आले आहे. अद्ययावत फर्मंटर, इनक्युबेटर आदी यंत्र सामग्री कार्यान्वित झाल्यानंतर प्रतिदिन १० टनपर्यंत उत्पादन घेणे शक्य होणार आहे. सध्या घनरूप आणि द्रवरुप बायोमिक्सची निर्मिती केली जात आहे.

सध्या दररोज २ ते ५ टन बायोमिक्स तयार केले जात आहे. मागणी वाढली असली तरी ना नफा ना तोटा तत्त्वावर प्रतिकिलो १५० रुपये दरानेच विक्री सुरू आहे. जुलै ते सप्टेंबर महिन्यात हळद उत्पादकाडून मोठी मागणी असते. शेतकरी रांगा लावून खरेदी करतात. तेलंगणा, कर्नाटक, गुजरात राज्यात देखील बायोमिक्सचा पुरवठा करण्यात आला. ‘आत्मा’अंतर्गतचे सेंद्रिय शेती गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, औरंगाबाद येथील सैन्य दलाची ग्रीन बटालियन, वनविभाग यांनी देखील बायोमिक्सची खरेदी केली. मराठवाड्यातील संशोधन, विस्तार शिक्षण केंद्र, कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी बायोमिक्स विक्रीसाठी उपलब्ध आहे.

प्रतिक्रिया दर वर्षी दोन एकर हळद लागवड असते. अनेक वर्षांपासून बेणे प्रक्रिया तसेच त्यानंतर बायोमिक्स वापरतो. करपा, हुमणीनियंत्रण होते. रासायनिक निविष्ठांच्या तुलनेत माफक किमतीतील बायोमिक्समुळे फायदा होत आहे. - नरेश शिंदे, शेतकरी, सनपुरी, जि. परभणी

प्रतिक्रिया

कंदकुज, कोंब सड, पानावरील करपा, हुमणीनियंत्रणासाठी गुणवत्ता सुधारण्यासाठी परिणामकारक असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांकडून सर्वाधिक मागणी आहे. आले,  केळी, मोसंबी आदी फळपिके, शेडनेटमधील भाजीपाला, द्राक्षे, डाळींब, ऊस उत्पादक शेतकरी बायोमिक्स मागत आहेत. - डॉ. कल्याण आपेट, विभाग प्रमुख, वनस्पती विकृतिशास्त्र,  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.  ९९२३३५७४३०, ९४०४५९२७९३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com