बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अकोला जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अकोट, तेल्हारा तालुक्यात बोंडअळी, बोंडसडमुळे पूर्ण पीक हातून गेले आहे, अनेकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान Big loss to farmers due to bollworm
बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान Big loss to farmers due to bollworm
Published on
Updated on

अकोला : जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अकोट, तेल्हारा तालुक्यात बोंडअळी, बोंडसडमुळे पूर्ण पीक हातून गेले आहे, अनेकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

अकोट तालुक्यात वडाळी देशमुख परिसरात या हंगामात मूग, उडीद, ज्वारीनंतर सोयाबीनचे पूर्ण नुकसान झाले होते. शेतकऱ्यांची अपेक्षा कपाशीवर असताना कपाशीने ही निराशा केली आहे.  दरम्यान, शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही निघालेला नाही. वडाळी देशमुख परिसरात कपाशीचे संपूर्ण पीकच शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. बोंडअळी, बोंडसडवर कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक प्रभावी ठरले नाही. बँकाकडून कर्ज काढून शेतकऱ्यांनी कपाशीसाठी खर्च केला. झाडांवर बोंडही परिपक्व झाल्याचे दिसत होते. परंतु बोंड उमलण्याच्या स्थितीत बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. अनेक शेतकऱ्यांना एकरी २० हजारांवर खर्च लागलेला आहे. परंतु हा पैसाही वसुल झाला नाही. शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना कोणीही लोकप्रतिनिधी, अधिकारी कपाशीच्या पाहणीसाठी आले नाहीत. या परिसरातील शेतकऱ्यांनीच आता कृषी विभाग, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांकडे बोंडअळीच्या नुकसानापोटी शासनाने पीक विमा मिळवून द्यावा. नष्ट झालेल्या पिकांच पंचनामे करावेत, अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया बोंडअळीच्या प्रादुर्भावाने पूर्ण पीक हातातून गेले आहे. बँकेचे काढलेले कर्ज फेडण्याचा, वर्षभर उदरनिर्वाह कसा चालवावा याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवा. -पुरुषोत्तम अंबडकार , शेतकरी, अकोट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com