भावली धरण भरले 

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील भावली धरण १०० टक्के पूर्ण भरले. त्यामुळे गुरुवारी (ता.२९) विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
Bhavli dam filled
Bhavli dam filled
Published on
Updated on

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील भावली धरण १०० टक्के पूर्ण भरले. त्यामुळे गुरुवारी (ता.२९) विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

‘‘भावली धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १ हजार ४३४ दशलक्ष घनफूट आहे. भावली धरण क्षेत्रात (ता.२९) अखेर २  हजार १८३ मिमी पाऊस झाला. धरण पूर्णपणे भरल्याने जलपुजन करण्यात आले. धरणातून आतापर्यंत ४५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला’’, अशी माहिती कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिली.

जलपूजनाप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषदेचे सदस्य गोरख बोडके, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपविभागीय अभियंता अरुण निकम, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलिस निरीक्षक सुधाकर नागरे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, शाखा अभियंता सुरेश जाचक, घोटी बाजार समितीचे संदीप गुळवे आदी उपस्थित होते.

झिरवाळ म्हणाले, ‘‘गतवर्षी भावली येथील पर्यटनासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले. कोरोना महामारीत राज्य सरकारला अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे पर्यटनमंत्र्यांची भेट घेऊन भावली धरणासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.’’

खोसकर म्हणाले, ‘‘भावली धरण परिसरातील नयनरम्य दृश्य, कोसळणारे धबधबे, धुक्याची चादर, कोसळणारा पाऊस येथील हा येथील निसर्गरम्य परिसर आहे. येथे पर्यटन विकसित करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. तालुक्यातील धरणातून शेती व पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com