नंदुरबार जिल्ह्यात होणार भगर लागवड

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यासाठी ‘एक जिल्हा एक उत्पादन’ साठी भगर पिकाची निवड झाली आहे.
Bhagar cultivation will be done in Nandurbar district
Bhagar cultivation will be done in Nandurbar district

नंदुरबार : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र शासन सहाय्यीत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठी राबवीत आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी ‘एक जिल्हा एक उत्पादन’ साठी भगर पिकाची निवड झाली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना चांगली संधी आहे. 

भगर पिकावर प्रक्रिया करून उत्पादन घेणारे किंवा सध्या कार्यरत कृषी अन्न प्रक्रिया प्रकल्पाचा विस्तार करू इच्छिणारे जिल्ह्यातील प्रकल्प योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील. अशा सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के रक्कम किंवा कमाल १० लाख रुपये अर्थसाहाय्य मिळणार आहे. 

जिल्ह्यातील १७५ वैयक्तिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यात सर्वसाधारण १४०, अनुसूचित जाती ५ आणि अनुसूचित जमातीच्या ३० लाभार्थ्यांची समावेश असेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाच्या http://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे. स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादन कंपनी, सहकारी उद्योजक संघ यांनाही योजनेचा लाभ घेता येईल. लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. 

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी जिल्ह्यात प्रशांत पाटील (९४०४०४८९१२), उल्हास बोरसे (९९६००५०१०१), जयेश देसले (९८९०१९५८१८), नीता देसाई (९९७५२२४८८३), विवेक तांबोळी (८९२८८१५४५१), सारंग वानखेडे (९९२२१६०१०६), हितेंद्र सोनवणे (९५७९७१३७३९), अजय पाटील (८२७५०५४३९३) आणि रमेश गोसावी (९८८१८०८६९८) यांची संसाधन व्यक्ती म्हणून नेमणूक केल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com