मधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर. टी. आटपाडीकर

मधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर. टी. आटपाडीकर
मधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर. टी. आटपाडीकर

‌अंबाजोगाई : ‘‘शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या जाती ओळखणे आवश्यक आहे. मधमाश्यांना उग्र वास सहन होत नाही. त्या वातावरणात होणाऱ्या बदलाचा अचूक अंदाज अगोदरच करतात. आपल्या वसाहतीची जागा बदलतात. मधमाशी पालनावेळी तिला नुकसान होणार नाही, अशा कीटकनाशकांचा वापर करावा’’, असे मत पुणे येथील मध्यवर्ती मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आर. टी. आटपाडीकर यांनी व्यक्त केले. 

अंबाजोगाई येथील दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र व ग्लोबल परळीतर्फे कृषी तंत्रज्ञान सप्ताहानिमित्त गाढे पिंपळगाव येथे मधमाशी पालन व शेवगा उत्पादन शेतकरी चर्चासत्र नुकतेच पार पडले. मधमाशी पालक दिनकर पाटील, फळबाग तज्ज्ञ नरेंद्र जोशी, पीक संरक्षण तज्ज्ञ राजेसाहेब हारे, ग्लोबल परळी समन्वयक भैरवी गावडे, कृषी विस्तार तज्ज्ञ सुहास पंके उपस्थित होते.

पंके म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतीला पूरक जोडधंद्याची सांगड घालणे आवश्यक आहे. त्यासाठी मधमाशी हा शेतकऱ्यांना चांगली आर्थिक प्राप्ती देणारा घटक आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे, प्रोत्साहित करणे, हा चर्चासत्राचा उद्देश आहे.’’ 

‌पाटील म्हणाले, ‘‘शेती करताना मधमाश्यांचे मोठे नुकसान केले आहे. विविध कीटकनाशकांच्या वापरामुळे मधमाश्‍यांच्या वसाहती नष्ट झाल्या आहेत. निसर्गातील ९५ टक्के परागीभवन केवळ मधमाश्यांच्या माध्यमातून होते. परागसिंचन कमी झाल्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. पीक फुलोरा अवस्थेत असताना मधमाश्यांची गरज सर्वात जास्त असते. विविध पिकांचे उत्पादन घेण्याची परंपरा नष्ट झाल्यामुळे मधमाश्यांची संख्या कमी झाली.’’

कृषी विज्ञान केंद्राचे फळबाग शास्त्रज्ञ नरेंद्र जोशी यांनी शेवगा पिकातील छाटणी तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘पिकाची अवस्था व वातावरण स्वतः अभ्यासून नियोजन करावे, शेवगा पिकात परागसिंचन होणे खूप आवश्यक आहे. अन्यथा, शेवगा शेंगांची गळ मोठ्या प्रमाणात होते. फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य व बोरॉनचा पुरवठा झाडाला करावा. शेवगा शेंगेचा तजेलदारपणा व चमक येऊन गुणवत्तावाढीसाठी वेळोवेळी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.’’

हारे म्हणाले, ‘‘शेवगा पिकावर शिफारस केलेली कीटकनाशके वापरा. हे पीक कीटकनाशक, बुरशीनाशक व तणनाशकाला मोठ्या प्रमाणात संवेदनशील आहे. शेवगा पिकातील फळ माशींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर करावा. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com