परभणी जिल्ह्यात आणखी ३८.५१ कोटींची पीकविमा भरपाई मंजूर

परभणी : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २०२१ मधील खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आणखीन ३८ कोटी ५१ लाख ७ हजार रुपये विमाभरपाई मंजूर करण्यात आली आहे.
 Another 38.51 crore crop insurance compensation sanctioned in Parbhani district
Another 38.51 crore crop insurance compensation sanctioned in Parbhani district
Published on
Updated on

परभणी : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २०२१ मधील खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आणखीन ३८ कोटी ५१ लाख ७ हजार रुपये विमाभरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ८२ हजार ९८५ पर्यंत, तर एकूण विमा परताव्याची रक्कम ३१० कोटी ५१ लाख ७ हजार रुपये झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी एकूण ४ लाख १० हजार ४४९ पूर्वसूचना विविध माध्यमांतून रिलायन्स विमा कंपनीकडे सादर केल्या होत्या. त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. एकूण २७ हजार ४६४ पूर्वसूचना विमाभरपाईसाठी अपात्र ठरल्या आहेत. त्यात ८८५ पूर्वसूचना पीकविमा प्रस्ताव सादर न केलेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. २५ हजार ५८७ पूर्वसूचना या दोन वेळा सादर केलेल्या आहेत. पीक कापणी सुरू झालेल्या ६६६ आणि इतर ३२६ पूर्वसूचनांचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात ३ लाख ५१ हजार १६० शेतकऱ्यांना २७२ कोटींचा विमा परतावा मंजूर केला होता. 

गुरुवार (ता.२०) पर्यंत दोन टप्प्यांतील मिळून एकूण ३ लाख ७८ हजार ७१५ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१० कोटी १९ लाख ८० हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली. 

विहित मुदतीत नुकसानीची पूर्वसूचना देऊनही पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तसेच पीकविमा प्रस्ताव भरताना शेतकऱ्यांचे नाव, बॅंक खाते क्रमांक, आयएफएससी कोड चुकले असतील, त्यांनी (rgicl.maharashtraagri@relianceada.com), (ravendra.kushwaha@relianceada.com), (pramod.patil@relianceada.com ),(sanjay.bhosle@relianceada.com) या ई-मेल आयडीवर पीकविमा पावती, नुकसानीच्या तक्रारीचा पुरावा, बँक पासबुक, आधार कार्ड झेरॉक्स यासह मेल पाठवावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी शेतकऱ्यांना केले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com