कृषिकन्या देतीय गृहउद्योगासह कृषी तंत्रज्ञानाचे धडे

महिलांना मोफत गृहउद्योगाचे धडे देत आत्मनिर्भर करण्यासाठी आधुनिक सावित्रीची लेक धडपड करीत आहे. देवळा तालुक्यातील भऊर येथील शेतकरी प्रकाश पवार यांची कन्या सुजाता पवार असे त्या धडपड्या मुलीचे नाव आहे.
Lessons in Agricultural Technology with Agricultural girl Home Industries
Lessons in Agricultural Technology with Agricultural girl Home Industries
Published on
Updated on

देवळा, जि. नाशिक : लॉकडाऊन काळात विस्कटलेल्या संसाराची घडी सावरण्यासाठी महिलांना मोफत गृहउद्योगाचे धडे देत आत्मनिर्भर करण्यासाठी आधुनिक सावित्रीची लेक धडपड करीत आहे. देवळा तालुक्यातील भऊर येथील शेतकरी प्रकाश पवार यांची कन्या सुजाता पवार असे त्या धडपड्या मुलीचे नाव आहे.

सध्या कोकण कृषी विद्यापीठात कृषी पदवीच्या ती अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. मिळालेल्या सुट्टीत आपल्या शिक्षणाचा वापर करत सुजाता गावातील महिलांना मोफत गृहउद्योगाचे धडे देत आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही कृषी क्षेत्रात आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाची ती माहिती देत आहे.

शेती अन् त्या संबंधित प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तिने कृषी शिक्षणाची वाट धरली आहे. सध्या गावी आलेली सुजाता परिसरातील महिलांना आंब्यापासून जाम, आंबा पोळी, आमचूर, सिरप, स्क्वॅश, लोणचे सारखे विविध पदार्थ, पनीर अशा विविध गोष्टी पाककृती शिकवत आहे.

ग्रामीण जागरूकता कार्य अनुभव हा कृषी पदव्यूत्तर शिक्षणाच्या चौथ्या वर्षामध्ये सादर केला जातो. दरम्यान शेती व संबंधित अडचणी ओळखणे, कृषी तंत्रज्ञान विस्तार, रोजगारनिर्मिती हे प्रमुख उद्देश आहेत. या गोष्टी कोरोनाच्या कारणास्तव फक्त कागदावर राहू नये म्हणून महिलांना भविष्यात रोजगार उपलब्ध व्हावा. या उद्देशाने मी हे मोफत प्रशिक्षण सुरू केले आहे. - सुजाता पवार, कृषी पदवी विद्यार्थिनी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com