
पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांनी कृषी तंत्र पदविका व तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशअर्ज यंदा ‘ऑनलाइन’ मिळणार असला, तरी तो संबंधित कृषी विद्यालयात ‘ऑफलाइन’ सादर करावा लागणार आहे.
दहावीनंतर कृषी शिक्षणाची संधी देणारा तंत्र पदविका अभ्यासक्रम दोन वर्षांचा असून, तो मराठी माध्यमातून असेल. कृषी तंत्रनिकेतनसाठी इंग्रजी माध्यमातून तीन वर्षांचा अभ्यासक्रम राहील.
आरक्षित प्रवर्गासाठी प्रवेशअर्जाचे शुल्क २०० रुपये, तर खुल्या गटासाठी ४०० रुपये आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने सात दिवसांमध्ये शाळा सोडल्याचा दाखला सादर न केल्यास प्रवेश रद्द केला जाणार आहे. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याला बारा टक्के गुणांचा अधिभार मिळविण्यासाठी ताजा सात-बारा उतारा द्यावा लागेल. विद्यार्थ्याचे पालक भूमिहीन शेतमजूर असल्यास नायब तहसीलदाराचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची तंत्र पदविका व तंत्रनिकेतनची ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया ९ सप्टेंबरपर्यंत चालू असेल. त्यासाठी WWW.Mpkv.in या संकेतस्थळाची मदत विद्यार्थ्यांना घेता येईल.
‘‘अर्ज छाननीनंतर किंवा गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर तक्रार उपस्थित झाल्यास विद्यार्थी आपली तक्रार सादर करू शकतील. त्यासाठी प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महाविद्यालयात निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. विद्यालयाचा कनिष्ठ संशोधन सहायक किंवा कृषी सहायक तसेच वरिष्ठ किंवा कनिष्ठ लिपिक सदस्य म्हणून तर सदस्य सचिवाची जबाबदारी कनिष्ठ संशोधन सहायक (शिक्षण) किंवा कृषी सहायकाकडे देण्यात आलेली आहे,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.
असे असेल प्रवेश शुल्क (आकडे रुपयांत) | |||
कृषी तंत्र पदविका | |||
अनुदानित | विनाअनुदानित | ||
प्रथम वर्ष | द्वितीय वर्ष | प्रथम वर्ष | द्वितीय वर्ष |
१६,९३० | १६,९०० | २३,९३० | २६,९०० |
विनाअनुदानित कृषी तंत्र निकेतन | ||
पहिले सत्र १९,१३० | दुसरे सत्र १६,८५० | तिसरे सत्र १८,०२० |
चौथे सत्र १६,८५० | पाचवे सत्र १८,०२० | सहावे सत्र १७,३५० |
(या प्रवेश शुल्कात वसतिगृहातील खर्चाचा समावेश करण्यात आलेला नाही.) |
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.