मांसाहारामुळे ‘कोरोना’ अशी अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई

sunil kedar
sunil kedar

नागपूर: मांसाहार कोरोना व्हायरसला कारणीभूत असल्याची अफवा पसरविणाऱ्यांविरोधात सायबर सेलकडे तक्रार करण्याचे निर्देश पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी रविवारी (ता. १६) दिले. पोल्ट्री उद्योगासमोरील अडचणींचा आढावा पशुसंवर्धनमंत्री केदार यांच्या उपस्थितीत रविवारी घेण्यात आला. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आशिष पातुरकर यांच्यासह पोल्ट्री उद्योजक पुरवठादार यांची यावेळी उपस्थिती होती. कोरोना वायरस चिकन-मटण खाल्ल्यामुळे होत असल्याचा अपप्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे.त्याचा फटका बसत चिकनचे घाऊक दर तीस रुपये किलोवर आले आहेत. उत्पादन खर्चाची भरपाईदेखील होत नसल्याने पोल्ट्री उद्योजक आर्थिक संकट आले आहेत.  याची दखल घेत पशुसंवर्धनमंत्री केदार यांनी सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांविरोधात पोलिस कारवाईचे निर्देश दिले. पशुसंवर्धन सचिवांना या संदर्भातील सूचना देण्यात आल्या. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणासह देशाच्या काही राज्यांमध्ये पोल्ट्री उद्योग नावारूपास आला आहे. याकरिता या भागात तेथील सरकारकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती घेण्याकरिता अभ्यास गट नियुक्त करण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. त्या त्या राज्यातील पोषक बाबींचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करता येईल का याची चाचपणी केली जाणार आहे.  पोल्ट्री उद्योगाने सोलरच्या वापरावर जास्तीत जास्त भर देण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. शासकीय पोल्ट्री नियंत्रण समिती पोल्ट्री उद्योगातील विविध समस्या व अडचणींचा आढावा वेळोवेळी घेता यावा याकरिता शासकीय पोल्ट्री नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. पोल्ट्री व्यवसाय करणारे शेतकरी, उद्योजक, शासकीय प्रतिनिधी तसेच शास्त्रज्ञ यांचा या समितीमध्ये समावेश असेल. पोल्ट्री उद्योगाच्या विस्ताराकरिता आवश्यक शिफारशी समिती शासनाला करणार आहे, असेही सुनील केदार यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com