कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची वसुली केल्यास कारवाई : सहकारमंत्री पाटील

मुंबई : ‘‘महाविकास आघाडीच्या महत्त्वाकांक्षी महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप झालेली नाही, अशा शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीचा तगादा लावल्यास बँकांवर कारवाई करण्यात येईल’’, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
Action taken if farmers eligible for loan waiver are recovered: Co-operation Minister Patil
Action taken if farmers eligible for loan waiver are recovered: Co-operation Minister Patil

मुंबई : ‘‘महाविकास आघाडीच्या महत्त्वाकांक्षी महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप झालेली नाही, अशा शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीचा तगादा लावल्यास बँकांवर कारवाई करण्यात येईल’’, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.  

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत दोन लाखांच्या आतील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदानाची घोषणा केली होती. मात्र ही योजना जाहीर केली आणि कोरोनाचा उद्रेक झाला.  त्यामुळे याची अंमलबजावणी करताना सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या ५० हजार रुपये अनुदानासाठी अडीच वर्षे वाट पाहावी लागली. तर जवळपास ६८ हजार शेतकरी कर्मजाफीपासून वंचित आहेत.

या योजनेसाठी ३२ लाख ८२ खाती पडताळणीनंतर पात्र ठरविण्यात आली होती. या शेतकऱ्यांना २० हजार २५० कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. यापैकी २० हजार २४४ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. 

कर्जखात्यांच्या पडताळणीसाठी आधार प्रमाणीकरण करण्यात आले होते. ३२ लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. त्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ देणे अपेक्षित होते. त्यापैकी ३१ लाख ७१ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम संबधित खात्यांमध्ये वळती केले आहे. त्यामुळे अजूनही ६८ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. या खात्यांबाबत काही त्रुटी असल्या तरी बँकांनी पुढाकार घेतला नसल्याने ते पैसे भरण्यासाठी आता कर्जदार शेतकऱ्यांना तगादा लावला जात आहे. काही कर्जदार मयत आहेत. त्यांच्या पत्नी किंवा मुलांचे आधार प्रमाणीकरण होत नाही. त्यांसह किरकोळ त्रुटींत अडकेली ही कर्जमाफी आता शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. 

सहकार विभागाकडे तक्रार करा

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बँकांना इशारा दिला आहे. कर्जखाती प्रमाणीकरणात पात्र ठरली असतील आणि किरकोळ कारणांनी कर्जमाफी झाली नसेल, तर अशांची वसुली करता येणार नाही. बॅंका वसुली करत असतील, तर सहकार विभागाशी संपर्क साधून तक्रार करा, असे आवाहनही त्यांनी कर्जदार शेतकऱ्यांना केले. 

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षभरात हा प्रश्न निकाली लागेल. कर्जखाती कर्जमाफी योजनेत पात्र ठरली असतील, तर त्यांची वसुली करता येणार नाही. तसे केल्यास कारवाई करू. - बाळासाहेब पाटील, सहकारमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com