दौंडमध्ये गूळ निर्मितीला वेग

दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ घरांत दिवसाकाठी ५०० ते ६०० टन गुळाची निर्मिती केली जात आहे. सध्या येथील गुऱ्हाळेघरे जोरात सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांनी कारखान्याऐवजी गुऱ्हाळाला ऊस देण्याची पसंती दिली आहे.
Accelerate jaggery production in the race
Accelerate jaggery production in the race
Published on
Updated on

पुणे : दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ घरांत दिवसाकाठी ५०० ते ६०० टन गुळाची निर्मिती केली जात आहे. सध्या येथील गुऱ्हाळेघरे जोरात सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांनी कारखान्याऐवजी गुऱ्हाळाला ऊस देण्याची पसंती दिली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

दौंड तालुक्यात जवळपास ३०० ते ४०० गुऱ्हाळ आहेत. यामध्ये राहू, केडगाव, पारगाव, यवत, खामगाव, पिंपळगाव परिसर हा उसाचा आगर म्हणून ओळखला जातो. यामध्ये राहू बेट परिसरात बारमाही महिने गुऱ्हाळे चालू असतात. त्यामुळे  गुऱ्हाळे  घरावर अनेक परप्रांतीय मजूर काम करीत आहेत. सध्या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांचा गुऱ्हाळावर ऊस देण्याचा कल कायम आहे. कारण  गुऱ्हाळे  हे एकावेळेस शेतकऱ्यांचे पैसे देत असतात. राहू बेट परिसरातून ऊस हा तालुक्यात व तालुक्याबाहेर जातो. परंतु गुऱ्हाळे अस्तित्व टिकवून आहेत. कारण इतर वेळेस शेतकऱ्यांना गुन्हाळघरे मदतीचा हात देत असतात. 

काही ठराविक कारखाने सोडले तर इतर कारखाने हे साधारणपणे २२०० रुपये पहिला हफ्ता देत आहेत. यानंतर जो काही मिळेल तो कमीत कमी चार महिने लागतात. परंतु तालुक्यातील गुऱ्हाळमालक ही हफ्ते न पाडता सर्व रक्कम एकरकमी म्हणजे २४०० ते २५०० रुपये देत आहेत. त्यामुळे शेतकरी हे गुऱ्हाळ घराकडे देखील वळत आहेत. तर अनेक शेतकरी कारखान्यांनाही ऊस देत असून कारखान्याकडून ऊस तोडणीच्या बाबतीत नंबरनुसार तोडी घेतात.

काही ठिकाणी प्रोग्रामनुसार न घेता व्यक्ती पाहून तोडी दिल्या जातात. त्यामुळे गुऱ्हाळे ही कायमच शेतकऱ्यांना मदतीचा हात देत असतात. अडचणीच्या काळात गुऱ्हाळ मालक शेतकऱ्याला उसाचे क्षेत्र पाहून उचल (अॅडव्हान्स) देखील देत आहेत. त्यामुळे कारखान्याइतकेच गुऱ्हाळघरांचे महत्त्व आज टिकून आहे.

तालुक्यातील राहू बेट परिसरात साधारणपणे ८० ते १०० गुऱ्हाळे आहेत. एक गुऱ्हाळ दिवसाला कमीत कमी सरासरीने १० टन (१०००० किलो) ऊस गाळप करू शकतो. ८० ते १०० गुऱ्हाळे हे त्या प्रमाणात ऊस गाळप करतात. राहू बेटात एक छोटा कारखाना चालू शकेल एवढा ऊस गुऱ्हाळे गाळप करत असतात. यंदा ऊस काही प्रमाणात कमी आहे. परंतु अतिरिक्त ऊस झाला तर गुऱ्हाळे ही शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना मदत करत असतात. त्यामुळे ऊस उत्पादकांना  गुऱ्हाळघरे आधार देणारी ठरली आहेत.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळे आहेत. त्यातून गुळाचे उत्पादन घेतले जाते. वर्षभर हा चालणारा उद्योग असल्याने मजुरांना चांगला रोजगार मिळाला आहे. तसेच शेतकऱ्यांनाही चांगले उत्पन्न मिळत असल्याने अनेक शेतकरी या व्यवसायात टिकून आहेत. - शशिकांत निवृती आखाडे, गूळ उत्पादक, कासुर्डी, ता. दौंड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com