सिंधुदुर्गात ६ हजार टन ऊसातोड शिल्लक

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ४२ हजार टन इतक्या उसाची तोडणी पूर्ण झाली असून, अजूनही ३ मार्चपर्यंत ६ हजार टन उसाची तोडणी शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यात १०० तोडणी यंत्रणा कार्यान्वित आहे. १२ मार्चपर्यंत तोडणी पूर्ण होईल अशी अपेक्षा कारखान्याला आहे.
6,000 tons of sugarcane left in Sindhudurg
6,000 tons of sugarcane left in Sindhudurg

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ४२ हजार टन इतक्या उसाची तोडणी पूर्ण झाली असून, अजूनही ३ मार्चपर्यंत ६ हजार टन उसाची तोडणी शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यात १०० तोडणी यंत्रणा कार्यान्वित आहे. १२ मार्चपर्यंत तोडणी पूर्ण होईल अशी अपेक्षा कारखान्याला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ हजार २०० हेक्टर क्षेत्र सध्या ऊस लागवडीखाली आहे.जिल्ह्यातील बहुतांशी ऊस कोल्हापूर जिल्ह्यातील असळज येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याला घातला जातो. या कारखान्याचा गाळप हंगाम या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाला. परंतु नादुरुस्त करूळ घाटरस्त्यामुळे या मार्गाने ऊस वाहतूक करण्यास ट्रकचालकांनी नकार दिला. त्यामुळे सुरुवातीच्या तीन महिन्यांत पाच हजार टनदेखील उसाची तोडणी झाली नाही. आंदोलनानंतर ऊसतोडणीला गती मिळाली.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तोडणी यंत्रणेत वाढ करण्यात आली. जिल्ह्यात सद्यःस्थितीत १०० तोडणी यंत्रणा कार्यरत आहे. आत्तापर्यंत ४२ हजार टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे. अजूनही ६ हजार टन उसाची तोडणी शिल्लक आहे. १२ मार्चला कारखान्याचा गाळप हंगाम बंद होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उर्वरित आठ ते नऊ दिवसांत ६ हजार टन ऊसतोडणीचे आव्हान आहे. तोडणीला विलंब झाल्याने एकरी ३५ ते ४० टन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात सरासरी ३० टक्के उत्पादनात घट झाली आहे. पुढील हंगामाचे वेळापत्रक देखील  कोलमडले आहे.

दरवर्षी माझे ३०० टन ऊस उत्पादित होतो. वेळेत तोडणी न झाल्यामुळे या वर्षी उत्पादनात घट झाली आहे. यावर्षी २६० टनच ऊस उत्पादन झाला आहे. उशिराने तोडणी झाल्यामुळे पुढील हंगामाचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. - अरविंद रावराणे, शेतकरी, सोनाळी, ता. वैभववाडी

ऊसतोडणी वेळेत व्हावी यासाठी आम्ही ऑक्टोबरपासून सातत्याने पाठपुरावा केला. परंतु नादुरुस्त करूळ घाटरस्त्याचा प्रश्‍न सुटला नाही. परिणामी, ऊसतोडणीला विलंबाने सुरुवात झाली.विलंबाने झालेल्या ऊसतोडणीची झळ अनेक शेतकऱ्यांना बसली. ऊस उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. - किशोर जैतापकर, शेतकरी, नापणे, ता. वैभववाडी

जिल्ह्यातील ४२ हजार टन उसाची तोडणी पूर्ण झाली असून, अजुनही ६ हजार टन उसाची तोडणी शिल्लक आहे. जिल्ह्यात सध्या १०० तोडणी कार्यान्वित आहे. येत्या बारा मार्चपर्यंत तोडणी पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. - बी. जी. शेळके, पर्यवेक्षक, साखर कारखाना, असळज  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com